रॉबिन उथप्पा बनला पिता, शेअर केला फोटो

टीम इंडियाचा स्टार बॅट्समन असलेला रॉबिन उथप्पा एका बालाचा पिता बनला आहे. पिता बनल्यानंतर रॉबिन उथप्पा याने आपला आनंद सोशल मीडियात शेअर केला.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 12, 2017, 08:55 PM IST
रॉबिन उथप्पा बनला पिता, शेअर केला फोटो
Image: Twitter

नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार बॅट्समन असलेला रॉबिन उथप्पा एका बालाचा पिता बनला आहे. पिता बनल्यानंतर रॉबिन उथप्पा याने आपला आनंद सोशल मीडियात शेअर केला.

१० ऑक्टोबर रोजी रॉबिन उथप्पा याची पत्नी शीतलने एका बाळाला जन्म दिला आहे. उथप्पाचं हे पहिलचं बाळ आहे. पिता बनल्यानंतर रॉबिन उथप्पाने आपली पत्नी शितल आणि बाळासोबत एक फोटो क्लिक केला आहे. हा फोटो उथप्पाने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आनंदाची बातमी दिली आहे.

रॉबिन उथप्पा सोशल मीडियात नेहमीच अॅक्टीव्ह असतो. याच माध्यमातून तो आपल्या चाहत्यांसोबत जोडलेला असतो. त्यामुळेच त्याने आपला आनंद आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला आहे.

मंगळवारी म्हणजेच १० ऑक्टोबर रोजी उथप्पाची पत्नी शीतल हिने बंगळुरुतील एका खासगी रुग्णालयात बाळाला जन्म दिला. रॉबिन उथप्पा आणि शीतल यांचा विवाह सोहळा मार्च २०१६ मध्ये झाला होता. त्याची पत्नी शीतल ही एक टेनिस प्लेअर आहे.

रॉबिन उथप्पा सध्या टीममधून बाहेर आहे. मात्र, आयपीएलमध्ये केकेआर टीमसाठी तो एक महत्वपूर्ण प्लेअर आहे. उथप्पाने केकेआरसाठी ओपनर बॅट्समन म्हणून खूप चांगलं प्रदर्शन केलं आहे. उथप्पाने टीम इंडियासाठी ४६ वन-डे मॅचेस खेळल्या आहेत. त्यामध्ये ५ हाफ सेंच्युरींच्या मदतीने ९३४ रन्स केले आहेत. त्यासोबतच टीम इंडियासाठी उथप्पाने १३ टी-२० मॅचेस खेळत २४९ रन्स केले आहेत. यामध्ये एका हाफ सेंच्युरीचा समावेश आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close