रोहन बोपण्णा आणि दिविज जोडीनं भारताला दिलं सहावं सुवर्ण

 भारताने कझाकिस्तान जोडीवर ६-३, ६-४ अशी मात करत हा विजय मिळवला आहे.

Updated: Aug 24, 2018, 12:19 PM IST
रोहन बोपण्णा आणि दिविज जोडीनं भारताला दिलं सहावं सुवर्ण  title=

मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिडापटूंनी आजही सुवर्ण कामगीरी सुरु ठेवली आहे. इंडोनेशियातल्या  आशियाई क्रीडा स्पर्धेत आज पुरुष दुहेरीत टेनिसचं सुवर्णपदक कमावून भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिविज शरण जोडीनं आपली निवड सार्थक ठरवलीय. बोप्पण्णा आणि शरण जोडीनं आज पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत कझाकिस्तानच्या जोडीवर सरळ सेट्समध्ये मात केली. टेनिसच्या पुरूष दुहेरीत भारताने कझाकिस्तान जोडीवर ६-३, ६-४ अशी मात करत हा विजय मिळवला आहे.

सुवर्णावर मोहोर 

चौरंगी नौकायन स्पर्धेत  भारताने आज  सुवर्णपदकवर मोहोर उमटवली. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या दत्तू भोकनळचा या संघात समावेश आहे. आजच्या दिवसातलं हे तिसरं पदक आहे.