रोहितने सिक्स लगावण्यात सचिन, युवराज आणि दादाला टाकले मागे!

साऊथ आफ्रिके विरूद्ध ब-याच दिवसांनी फॉर्ममध्ये आलेल्या हिटमॅन रोहित शर्माने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 13, 2018, 10:10 PM IST
रोहितने सिक्स लगावण्यात सचिन, युवराज आणि दादाला टाकले मागे!

नवी दिल्ली : साऊथ आफ्रिके विरूद्ध ब-याच दिवसांनी फॉर्ममध्ये आलेल्या हिटमॅन रोहित शर्माने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. 

रोहितचं दमदार कमबॅक

पाचव्या सामन्यात रोहितने आपल्या शतकीय खेळीत जसेही ४ सिक्सर लगावले तेव्हाच त्याने अनेक रेकॉर्ड्स केले. या सीरिजमध्ये रोहित ब-याच दिवसांनी दमदार खेळलाय. पाचव्या सामन्यात रोहितने १२६ बॉल्समध्ये ११५ रन्सची दमदार खेळी केली. यात त्याने ११ फोर आणि ४ सिक्सर लगावले. यासोबतच त्याने सिक्स लगावण्यात अनेक रेकॉर्ड आपल्या नावी केले. 

हे करणारा पहिला क्रिकेटर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडरमध्ये रोहित शर्माने ६५ सिक्सर लगावले आहेत. ही कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटर आहे. यासोबतच सीझन २०१७-१८ मध्ये रोहित शर्माने सर्वाधिक ५७ सिक्स झळकावले आहेत. साऊथ आफ्रिके विरूध्द पहिल्या चार वनडे सामन्यात रोहित पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. 

दिग्गजांना सोडले मागे

पाचव्या सामन्यात रोहितने ४ सिक्सर ठोकत टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक सिक्सर लगावण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर, युवराज सिंह आणि सौरव गांगुली यांना मागे टाकले. रोहित आता या यादीत महेंद्र सिंह धोनीनंतर दुस-या स्थानावर आहे. 

टीम इंडियाकडून सर्वाधिक सिक्सर लगावणारे खेळाडू

३३८ महेंद्र सिंह धोनी
२६५ रोहित शर्मा
२६४ सचिन तेंडुलकर
२५१ युवराज सिंह
२४७ सौरव गांगुली

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close