सचिनकडून विनोद सोबतचा वाद संपुष्टात

आज सचिन ने स्वतः हा फोटो प्रसिद्ध करून आता विनोदशी असलेले मतभेद संपुष्टात आल्याचं स्पष्ट केलं आहे.

Updated: Nov 10, 2017, 05:46 PM IST
सचिनकडून विनोद सोबतचा वाद संपुष्टात

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : परवा मुंबई रणजी @ 500 हा BKC एमसीए ग्राऊंडवर झालेल्या कार्यक्रमानंतर अतुल रानडे यांनी काढलेला सेल्फी आज थोड्या वेळापूर्वीच स्वतः सचिनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टाकला आहे.

सचिन विनोद अगदी शेजारी उभे

यात अतुलसोबत सचिन विनोद अगदी शेजारी उभे आहेत. अमोल मुझुमदार आणि अजित आगरकारही आहेत. याआधी मुंबईत नुकताच एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सेल्फीमध्ये सचिन विनोद एकत्र आले होते. 

मास्टर ब्लास्टरला विनोदचं 'आय लव्ह यू' 

फॅशन फोटोग्राफर अतुल कसबेकर यांनी काढलेला तो सेल्फी स्वतः ट्विट केला होता. विनोदने त्यावर मास्टर ब्लास्टर 'आय लव्ह यू' असं रि ट्विट केलं होतं. पण MCA कार्यक्रमात सचिन-विनोद अंतर राखून असल्यामुळे दुरावा कायम असल्याचंच जाणवून येत होते.

फोटो प्रसिद्ध करून मतभेद संपुष्टात आल्याचं स्पष्ट

विनोदाने जाहीर कार्यक्रमात संवादाचा प्रयत्नही केला होता. पण कार्यक्रमानंतर बॅकस्टेज सर्व मुंबई क्रिकेटवीर एकत्र आले. आज सचिन ने स्वतः हा फोटो प्रसिद्ध करून आता विनोदशी असलेले मतभेद संपुष्टात आल्याचं स्पष्ट केलं आहे.  क्रिकेटने मला आयुष्यभरासाठी खूप चांगले मित्र दिल्याची प्रतिक्रियाही सचिनने व्यक्त केली आहे.