'न्यू इयर सेलिब्रेशन'च्या रात्री सचिन तेंडुलकर मित्रांंसाठी झाला 'मास्टरशेफ'

तब्बल २४ वर्ष २२ यार्डाच्या क्रिकेट मैदानात घालवल्यानंतर आता सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.

Updated: Jan 2, 2018, 12:58 PM IST
'न्यू इयर सेलिब्रेशन'च्या रात्री सचिन तेंडुलकर मित्रांंसाठी झाला 'मास्टरशेफ'  title=

मुंबई : तब्बल २४ वर्ष २२ यार्डाच्या क्रिकेट मैदानात घालवल्यानंतर आता सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.

क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन आजही जुन्या सआथीदारांबरोबर मजामस्ती करतो.  

न्यू इयर सेलिब्रेशन 

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर सचिन अनेकदा इतर खेळ आणि त्याच्या कुटुंबामध्ये रमलेला दिसतो. यापूर्वीही सचिनने अनेकदा त्याचं पाककौशल्य उत्तम करण्याकडे लक्ष दिले आहे. नववर्षाच्या रात्रीही सचिनने त्याच्या खास मित्रांसाठी जेवण बनवले होते.  

सचिन तेंडुलकरने त्याच्या मित्रांसाठी बार्बेक्यु बनवल्याचा खास व्हिडिओ आज सोशल मीडियामध्ये शेअर केला आहे.  मित्रांसाठी न्यू इयरच्या रात्री पदार्थ बनवून खायला देणं ही गोष्ट फारच मस्त असल्याच्या आशयाचे ट्विट सचिनने केले आहे.  

 

 
 अजित आगरकर आणि युवराजला दावत 

 

Thanks @sachintendulkar for the lovely night was great fun ‘#monster Agarkar 

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial) on

 
 युवराज सिंगनेही सोशल मीडियावर न्यू इयर पार्टीचे खास फोटो शेअर केले आहेत.  काही दिवसांपूर्वी सचिनने गोल्फ खेळल्याचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता सचिन राज्यसभेत खासदार आहे.