सामन्याआधी सचिनने या खेळाडूला दिल्या बॅटींगच्या खास टीप्स!

 मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने त्याच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून अजिंक्य रहाणेची भेट घेतली. यावेळी सचिनने रहाणेला बॅटींगच्या काही खास टीप्सही दिल्यात. 

Updated: Sep 14, 2017, 10:11 PM IST
सामन्याआधी सचिनने या खेळाडूला दिल्या बॅटींगच्या खास टीप्स!

नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने त्याच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून अजिंक्य रहाणेची भेट घेतली. यावेळी सचिनने रहाणेला बॅटींगच्या काही खास टीप्सही दिल्यात. 

रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या सीरिजला सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सचिनने रहाणेची घेतलेली भेट महत्वाची मानली जात आहे. रहाणे सचिनच्या भेटण्याने चांगलाच खुश आहे. 

अजिंक्य रहाणे याने नेट सेशनचा एक फोटो सोशल मीडियात शेअर केलाय. यात रहाणेसोबत सचिन दिसतो आहे. यात त्याने लिहिले की, ‘सेशन चांगलं होतं. तुमच्या बहुमल्य वेळेसाठी आणि प्रेरणादायी शब्दांसाठी खूप खूप धन्यवाद पाजी’.

सचिनने ऑस्ट्रेलिया विरूद्ध होत असलेल्या आगामी सीरिजसाठी रहाणेला शुभेच्छा दिल्या. रहाणेच्या ट्विटला रिप्लाय करत सचिन म्हणाला की, ‘तुला देशासाठी चांगलं प्रदर्शन करताना पाहून नेहमीच आनंद होतो. आगामी सीरिजसाठी खूप खूप शुभेच्छा’.

दरम्यान, शिखर धवन हा पत्नीची तब्येत बरी नसल्याने पहिल्या तीन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. असे मानले जात आहे की, अजिंक्य रहाणे रोहित शर्मासोबत खेळाची सुरूवात करणार.