सायना नेहवाल श्रद्धा कपूरला देतीय बॅडमिंटनचे धडे

आतापर्यंत बॉलिवूडच्या पडद्यावर दिसणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर आता बॅडमिंटनच्या कोर्टवर दिसत आहे. तेसुद्धा असे तसे नव्हे तर, चक्क बॅडमिंटनपटू सायना नेहवालकडून बॅडमिंटनचे धडे घेताना. सहाजिकच अनेकांच्या भूवया उंचावल्या असतील. आता ती तिथे काय करतीय? पण, त्याला कारणही तसेच आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 13, 2017, 05:11 PM IST
सायना नेहवाल श्रद्धा कपूरला देतीय बॅडमिंटनचे धडे

नवी दिल्ली : आतापर्यंत बॉलिवूडच्या पडद्यावर दिसणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर आता बॅडमिंटनच्या कोर्टवर दिसत आहे. तेसुद्धा असे तसे नव्हे तर, चक्क बॅडमिंटनपटू सायना नेहवालकडून बॅडमिंटनचे धडे घेताना.

श्रद्धाला बॅडमिंटनच्या कोर्टवर पाहून सहाजिकच अनेकांच्या भूवया उंचावल्या असतील. आता ती तिथे काय करतीय? पण, त्याला कारणही तसेच आहे. सायना नेहवालवर लवकरच एक बायोपिक येत आहे. ज्यात सायनाच्या भूमिकेत श्रद्धा झळकणार आहे. एखादी व्यक्तीरेखा साकारायची तर त्या व्यक्तिमत्वाचे गुण-अवगुण अभ्यासने हे कोणत्याही कलाकारासाठी महत्त्वाचे. म्हणूनच या बायोपिकमध्ये कोणतीही कसर राहू नये यासाठी श्रद्धा कसून प्रयत्न करत आहे. त्यासाठी तिने थेट सायनालाच गाठले असून, आंतरराष्ट्रीय दर्जावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या या खेळाडूकडून ती बॅडमिंटनचे धडे घेत आहे.

दरम्यान, केवळ बॅडमिंटन किंवा त्यातले बारकावे शिकणे इतकाच माफक विचार करून श्रद्धा तिथे पोहोचली नाही. तर, व्यक्तिमत्व म्हणून सायना कशी आहे. तिच्या आजवरच्या जीवनातील चढ-उतार कसे राहिले. त्यातून तिने कसा मार्ग काढला. अत्यंत आनंदाच्या आणि दु:खाच्या क्षणी ती कशी रिअॅक्ट होते. यांसारख्या अनेक बारीकसारीक गोष्टींही श्रद्धा समजून घेणार आहे. 

दरम्यान, सायनाने आपल्या बॅडमिंटन सरावादरम्यानचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. ज्यात तिच्यासोबत श्रद्धा कपूर आणि तिचा कोच पुलेला गोपीचंदही दिसत आहेत. या फोटोखाली, 'बॅडमिंटन प्रॅक्टीस सेशन, गोपी सर, श्रद्धा कपूर आणि मी', असे सायनाने लिहीले आहे. 

दरम्यान, इंस्टाग्रामवरही सायनाने एक फोटो शेअर केला असून, त्यातही सायना आणि श्रद्धा दिसत आहेत.