सेहवागने शेअर केला ७५ वर्षीय टायपिस्ट अम्माचा व्हिडीओ

भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग ज्याप्रमाणे बॉलर्सची धुलाई करायचा ज्यामुळे जगातील सर्वच गोलंदाज त्याला घाबरुन असता. मात्र क्रिकेटच्या या वीरुची एका महिलेशी भेट झाली. या महिलेला वीरु सुपरवुमन म्हणतो. 

Updated: Jun 12, 2018, 08:37 PM IST
सेहवागने शेअर केला ७५ वर्षीय टायपिस्ट अम्माचा व्हिडीओ

मुंबई : भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग ज्याप्रमाणे बॉलर्सची धुलाई करायचा ज्यामुळे जगातील सर्वच गोलंदाज त्याला घाबरुन असता. मात्र क्रिकेटच्या या वीरुची एका महिलेशी भेट झाली. या महिलेला वीरु सुपरवुमन म्हणतो. ७५ वर्षीय महिलेची चपळता पाहून खुद्द वीरुही अवाक झाला. इतक्या चपळतेने टायपिंग करते की ते पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल की ही महिला आहे की बिजली. मध्य प्रदेशच्या सिहोर जिल्ह्यात राहणऱ्या या महिलेचा हात टायपिंग मशीनवर असा चालतो जणू काही रोबोटच काम करतोय.

भारतात टॅलेंटेड लोकांची कमी नाहीये. सध्या सोशल मीडियावर एका ७५ वर्षीय अम्माचा व्हिडीओ व्हायरल होतोय. सेहवागने हा व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केलाय. या महिलेला सोशल मीडियावर लोकांनी टायपिस्ट अम्मा असे नाव दिलेय.

वीरेंद्र सेहवागने या टायपिस्ट अम्माचा व्हिडीओ शेअर करताना म्हटलेय, माझ्यासाठी ही सुपरवुमन आहे. तरुणांना या अम्माकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. कोणतंही काम हे लहान नसते आणि शिकण्याचे कोणतेही वय नसते.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close