विराट कोहलीसोबत काढा सेल्फी

टीम इंडियाचा संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याबरोबर आता सेल्फी काढणे सहज शक्य होणार आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 5, 2018, 11:19 PM IST
विराट कोहलीसोबत काढा सेल्फी title=
Pic - Twitter

मुंबई : टीम इंडियाचा संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याबरोबर आता सेल्फी काढणे सहज शक्य होणार आहे. स्वत: विराट कोहलीच ही संधी त्याच्या चाहत्यांना देणार आहे.  ट्विटरवरुन विराटनं याबाबत माहिती दिलीय. सेल्फी घेण्यासाठी फक्त विराटच्या चाहत्यांना दिल्लीला जावं लागणार आहे. 

कारण दिल्लीच्या मादाम तुसाँ संग्रहालयात आता विराटचा पुतळा बसवण्यात येणार आहे.  ६ जूनपासून सर्वसामान्यांना हा पुतळा पाहाता येईल.  मादाम तुसाँद संग्रहालयातील आपल्या प्रवेशाबाबत उत्साहित असल्याचंही विराट म्हणाला.