चिमुरड्याला ४० वेळा थोबाडीत मारणाऱ्या शिक्षिकेवर भडकला गब्बर

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील एका शाळेतील व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत शिक्षिका एका मुलाला कानाखाली मारत असल्याचे दिसत होते. 

Updated: Sep 11, 2017, 04:02 PM IST
चिमुरड्याला ४० वेळा थोबाडीत मारणाऱ्या शिक्षिकेवर भडकला गब्बर title=

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर उत्तर प्रदेशातील एका शाळेतील व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत शिक्षिका एका मुलाला कानाखाली मारत असल्याचे दिसत होते. 

या व्हिडीओवर भारताचा सलामीवीर शिखर धवनने नाराजी व्यक्त केलीये. शिक्षिकेचा हा व्हि़डीओ त्याने स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलाय. 

खरंतर, लखनऊमध्ये एका शाळेत मुलाने हजेरी घेत असताना येस मॅम असे म्हटले नाही म्हणून शिक्षिकेने त्याला मुलाला तब्बल ४० वेळा थोबाडीत मारल्या. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. सीसीटीव्हीचे हे फुटेज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

हा व्हिडीओ पाहून धवन चांगलाच संतापला. जर या शिक्षिकेलाही अशाच प्रकारे मारुन शाळेतून काढून टाकले असते तर चांगलं झालं असतं, अशा शब्दात धवनने आपला संताप ट्विटरवर व्यक्त केला.