मुरली विजय ऐवजी शिखरची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड

Last Updated: Monday, July 17, 2017 - 16:43
मुरली विजय ऐवजी शिखरची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड

नवी दिल्ली : आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा सलामीवीर मुरली विजयच्या ऐवजी शिखर धवनचा संघात समावेश करण्यात आलाय. बीसीसीआयने सोमवारी ही माहिती दिली. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यादरम्यान विजयच्या मनगटाला दुखापत झाली होती. त्यानंतर आता सराव सामन्यादरम्यान त्याने पुन्हा उजव्या मनगटाला त्रास होत असल्याची तक्रार केली. त्यामुळे त्याच्या जागी धवनची निवड करण्यात आलीये.

धवन ऑक्टोबर २०१६मध्ये न्यूझीलंडविरुद्ध अखेरची कसोटी खेळला होता.  धवनने आतापर्यंत २३ कसोटी सामने खेळलेत. यात त्याने ३८.५२च्या सरासरीने १४६४ धावा केल्यात. 

येत्या २६ जुलैपासून भारताचा श्रीलंका दौऱा सुरु होतोय. यात तीन कसोटी , पाच वनडे आणि एक टी-२० खेळवण्यात येणार आहे. 

First Published: Monday, July 17, 2017 - 16:43
comments powered by Disqus