युवराज सिंहने अशी उडवली शोएब अख्तरच्या ट्विटची खिल्ली

माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर भलेही मैदानात असो वा नसो, पण तो कॉमेंट्री आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससोबत कनेक्ट असतो.

Updated: Dec 28, 2017, 06:28 PM IST
युवराज सिंहने अशी उडवली शोएब अख्तरच्या ट्विटची खिल्ली title=

मुंबई : माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर भलेही मैदानात असो वा नसो, पण तो कॉमेंट्री आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससोबत कनेक्ट असतो.

बुधवारी त्याने एक ट्विट केले असून त्यात एक गंभीर बाब तो बोलला. पण युवराज सिंह याने शोएबला ट्रोल केलं.  शोएबने ट्विट केलं की, ‘केवळ हार्ड वर्क म्हणजे कठिण मेहनत तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहचवू शकते’.

शोएबने तर खूपच महत्वाची गोष्ट सांगितली, पण त्याच्या या ट्विटवर भारतीय क्रिकेटर युवराज सिंहने त्याची गंमत केली. युवराजने त्याच्या फोटोवर निशाणा साधत पंजाबीत लिहिले की, ‘ते तर ठिक आहे भाई, पण तू वेल्डिंग करण्यासाठी कुठे जाणार आहे’.

या ट्विटवर इतर यूजर्सही तुटून पडले आहेत. शोएबच्या चांगल्या ट्विटला सोडून लोकं त्याच्या फोटोच्या मागे लागले आहेत. ज्यात तो काळा चष्मा, हातात हेल्मेट पकडून आणि लांब हॅन्डग्लव्ज घालून आहे.