लिप्सटिक-आयशॅडो लावून आला शोएब अख्तर!

क्रिकेट जगतामध्ये रावळपिंडी एक्स्प्रेस नावानं प्रसिद्ध असणारा शोएब अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Updated: Jun 20, 2017, 05:01 PM IST
लिप्सटिक-आयशॅडो लावून आला शोएब अख्तर! title=

मुंबई : क्रिकेट जगतामध्ये रावळपिंडी एक्स्प्रेस नावानं प्रसिद्ध असणारा शोएब अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लिपस्टिक आणि आयशॅडो लावलेल्या शोएब अख्तरचा एक व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे शोएबला ट्रोलही केलं जात आहे. जिओ टीव्हीच्या एका कॉमेडी शोमध्ये शोएब अख्तर जज म्हणून आला होता.

या व्हिडिओमध्ये शोएब अख्तर स्वत:च्या लहानपणाबद्दल प्रेक्षकांना सांगत आहे. मी लहानपणी कधीच रडलो नाही. जन्म झाला तेव्हाही मी रडलो नाही. मी आईला कधीच त्रास दिला नाही. आरडाओरडाही केला नाही, असं मला आईनं सांगितल्याचं शोएब या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे. 

पाहा लिपस्टिक-आयशॅडो लावलेल्या शोएबचा व्हिडिओ