महामुकाबल्या आधी पाकिस्तानचा डर्टी गेम, शमीच्या धर्मावर वक्तव्य

यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या भारत आणि पाकिस्तानच्या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Updated: May 29, 2017, 07:00 PM IST
महामुकाबल्या आधी पाकिस्तानचा डर्टी गेम, शमीच्या धर्मावर वक्तव्य title=

लंडन : यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या भारत आणि पाकिस्तानच्या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण या मॅचआधी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकनं एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शोएब मलिकनं भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीच्या धर्मावर वक्तव्य केलं आहे.

भारताचा कोणता बॉलर तुला आवडतो असं शोएब मलिकला विचारण्यात आलं. मोहम्मद शमी हा भारताचा सर्वोत्तम बॉलर आहे. शमी आवडण्याचं कारण तो मुस्लिम आहे हे नाही तर मी त्याची बॉलिंग बघितली आहे आणि त्याच्याविरुद्ध खेळलोही आहे. शमीविरुद्ध खेळणं कठीण असतं, असं मलिक म्हणाला.

मलिकच्या याच वक्तव्यावर सध्या सोशल नेटवर्किंगवर टीका होत आहे. शमीचा उल्लेख करताना त्याचा धर्म काढायची गरज काय होती, असा सवाल विचारला जात आहे.

पाहा काय म्हणाला शोएब मलिक