निवड न झाल्यामुळे कामगिरीत फरक पडतो, श्रेयस अय्यरची कबुली

चांगलं प्रदर्शन केल्यानंतरही टीममध्ये निवड होत नसेल तर...

Updated: Aug 14, 2018, 08:12 PM IST
निवड न झाल्यामुळे कामगिरीत फरक पडतो, श्रेयस अय्यरची कबुली title=

बंगळुरू : चांगलं प्रदर्शन केल्यानंतरही टीममध्ये निवड होत नसेल तर त्याचा कामगिरीमध्ये फरक पडतो, अशी कबुली भारताचा क्रिकेटपटू श्रेयस अय्यरनं दिली आहे. प्रत्येकवेळा सबुरी ठेवणं कठीण असतं. जेव्हा तुम्ही चांगले खेळत असता, रन बनवत असता तरीही तुमची भारतीय टीममध्ये निवड होत नसेल तर याचे विचार सारखे तुमच्या मनात येतात, असं अय्यर म्हणाला. घरगुती स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर श्रेयस अय्यरला वनडे टीममध्ये जागा मिळाली होती. यावर्षी फेब्रुवारीमध्ये अय्यर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची वनडे मॅच खेळला होता.

मागच्या वर्षी न्यूझीलंड ए विरुद्ध भारत ए कडून खेळताना अय्यरनं ३१७ रन केले होते. तीन वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये अय्यरला दिल्लीच्या टीमनं विकत घेतलं आणि दोन वर्षानंतर त्याला कर्णधार बनवलं. कर्णधार झाल्यामुळे दबाव असताना सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्याची प्रेरणा मिळते. मला कर्णधारपद भुषवणं आवडतं. कर्णधार असताना दबावात स्वत: आणि टीमकडून सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करून घ्यायचा मी प्रयत्न करतो, असं अय्यर म्हणालाय.