भारताची कर्णधार मिताली राजला मिळणार शानदार बीएमडब्लू

आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये जरी भारताला जेतपद मिळवण्यात यश आले नसले तरी संपूर्ण स्पर्धेत दमदार प्रदर्शनामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जातेय.

Updated: Jul 25, 2017, 04:10 PM IST
भारताची कर्णधार मिताली राजला मिळणार शानदार बीएमडब्लू title=

नवी दिल्ली : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये जरी भारताला जेतपद मिळवण्यात यश आले नसले तरी संपूर्ण स्पर्धेत दमदार प्रदर्शनामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जातेय.

पंतप्रधान मोदींपासून ते अनेक सेलिब्रेंटींनी टीम इंडियाचे कौतुक केलेय. बीसीसीआयकडून महिला संघाला प्रत्येकी ५० लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केलेय.

कर्णधार मिताली राजलाही संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यामुळे तेलंगणा बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष चांमुडेश्वर नाथ यांनी मितालीला बीएमडब्लू कार देणार असल्याची घोषणा केलीये. याआधी चांमुडेश्वर नाथ यांनी २००७मध्ये मितालीला शेर्वेलो कार गिफ्ट केली होती.