पाकिस्तानविरुद्ध ही छोटीशी चूक पडू शकते महागात

टीम इंडिया समोर ही मोठी समस्या

Updated: Sep 19, 2018, 10:44 AM IST
पाकिस्तानविरुद्ध ही छोटीशी चूक पडू शकते महागात title=

मुंबई : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्या छोटीशी चूकही टीम इंडियाला चांगलीच महागात पडू शकते. नो-बॉल ही मोठी समस्या टीम इंडियाला भेडसावते आहे. प्रामुख्यानं जसप्रीत बुमराहला नो-बॉल विकेट घेण्याची सवयच लागली आहे. ती सवय त्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोडावी लागणार आहे.

2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात फकर झमानला बाद करण्यात जसप्रीत बुमराहला यश आलं होतं. मात्र, त्यानं फकरला नो-बॉलवर बाद केलं होतं. बुमराहची ही चूक टीम इंडियाला चांगलीच महागात पडली होती. फकरनं मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलत शतक झळकावत पाकिस्तानला पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरुन दिलं होतं. चॅम्पियन्स ट्रॉफीतील बुमराहचा हाच नो-बॉल टीम इंडियाच्या पराभवाला कारणीभूत ठरला होता.

नो-बॉलची समस्या बुमराह अजूनही सोडवू शकलेला नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही याचीच पुनरावृत्ती पहायाला मिळाली. बुमराहच्या नो-बॉलची समस्या अजूनही कायम आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही नो-बॉलच्या समस्येचा मोठा फटका टीम इंडियाला बसला. बुमराह सातत्यानं नो-बॉल टाकत असल्यानं त्याला टीकेला समोर जावं लागलं होतं. माजी कर्णधार सुनील गावसकरपासून ते सामान्य क्रिकेट चाहत्यांपर्यंत अशा साऱ्यांचाच तो टीकेचं लक्ष्य झाला होता. 

सोशल नेटवर्किंग साईटवर त्याच्यावर चांगलीच टीका झाली होती. आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बुमराहला आपल्या गोलंदाजीत कमालीची सुधारणा करावी लागेल. अन्यथा चॅम्पियन्स ट्रॉफीप्रमाणेच भारताला आशियाचा चषकातही या नो-बॉलचा मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटपटूंधील मैदानावरील टशन कायमच क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरते.