१५ वर्षाच्या या कुस्तीपटूने जिंकले सुवर्णपदक

भारताची युवा कुस्तीपटू सोनम मलिकने अथेन्स(ग्रीस) येथे आयोजित वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलेय.

Updated: Sep 8, 2017, 10:32 PM IST
१५ वर्षाच्या या कुस्तीपटूने जिंकले सुवर्णपदक title=

नवी दिल्ली : भारताची युवा कुस्तीपटू सोनम मलिकने अथेन्स(ग्रीस) येथे आयोजित वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलेय.

५६ किलो वजनी गटात १५ वर्षीय सोनमने जपानच्या सेना नागामोटोला फायनलमध्ये ३-१ असे हरवले. पहिल्या राऊंडमध्ये सोनमने प्रतिस्पर्धीविरुद्ध २-० अशी आघाडी घेतली होती.

दुसऱ्या राऊंडमध्ये तिने एक गुण गमावला. त्यानंतर तिसऱ्या राऊंडमध्ये आणखी एक गुण कमावला आणि खिताब आपल्या नावे केला. 

याव्यतिरिक्त ४३ किलो वजनी गटात भारताच्या नीलमने रोमानियाच्या रोक्साना अलेक्झांडरला ६-४ असे हरवत कांस्यपदकाची कमाई केली.