कुंबळेंमुळे कुलदीपला भारतीय संघात स्थान- रैना

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादवची भारताचा क्रिकेटर सुरेश रैनाने कौतुक केलेय. कुलदीप यादवने तिन्ही प्रकारात चांगली कामगिरी केल्याने तो भारतीय संघातील महत्त्वाचा क्रिकेटर ठरलाय.

Updated: Oct 12, 2017, 08:34 PM IST
कुंबळेंमुळे कुलदीपला भारतीय संघात स्थान- रैना

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादवची भारताचा क्रिकेटर सुरेश रैनाने कौतुक केलेय. कुलदीप यादवने तिन्ही प्रकारात चांगली कामगिरी केल्याने तो भारतीय संघातील महत्त्वाचा क्रिकेटर ठरलाय.

कुलदीप यादवचे कौतुक करताना रैना म्हणाला, कुलदीप यादवच्या चांगल्या कामगिरीचे श्रेय माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना जाते. कुलदीप चांगली कामगिरी करतोय आणि त्याचे श्रेय अनिल भाईंना जाते. त्यांनी कुलदीपवर खूप मेहनत घेतली. 

रैना म्हणाला, मी कुलदीपशी आयपीएलमध्ये बोलायचो. तो नेहमीच कुंबळे सरांना मेसेज करायचा. कुंबळेंनी त्याच्यावर मेहनत घेतली होती. कानपूरच्या 22 वर्षीय कुलदीपने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्टमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर वनडेत हॅटट्रिक घेण्याचा विक्रम केला होता.