भारताचा श्रीलंकेवर विजय, विराटने रचला इतिहास

टीम इंडियाने श्रीलंकेला टेस्टमध्ये एक इनिंग आणि १७१ रनने पराभवाची धूळ चारली आहे. भारताने ही टेस्ट सीरीज 3-0 ने जिंकली आहे. भारताने सोबतच 1932 मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यूनंतर 85 वर्षानंतर दुसऱ्या देशात इतिहास रचला आहे. टीम इंडियाने 2004 मध्ये बांग्लादेश आणि 2005 मध्ये जिम्बाब्वेला क्लीन स्वीप केलं होतं. त्यानंतर आता श्रीलंकेला व्हाईट वॉश दिला आहे.

Updated: Aug 14, 2017, 03:15 PM IST
भारताचा श्रीलंकेवर विजय, विराटने रचला इतिहास title=

कोलंबो : टीम इंडियाने श्रीलंकेला टेस्टमध्ये एक इनिंग आणि १७१ रनने पराभवाची धूळ चारली आहे. भारताने ही टेस्ट सीरीज 3-0 ने जिंकली आहे. भारताने सोबतच 1932 मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यूनंतर 85 वर्षानंतर दुसऱ्या देशात इतिहास रचला आहे. टीम इंडियाने 2004 मध्ये बांग्लादेश आणि 2005 मध्ये जिम्बाब्वेला क्लीन स्वीप केलं होतं. त्यानंतर आता श्रीलंकेला व्हाईट वॉश दिला आहे.

विराट कोहली भारतीय टेस्ट क्रिकेटमध्ये 85 वर्षातला असा पहिला कर्णधार ठरला आहे ज्याने पहिल्यांदा दुसऱ्या देशात ३ सामन्यांची सिरीज व्हाईटवॉश देत जिंकली आहे. कोणताही भारतीय कर्णधार दुसऱ्या देशात जाऊन ३ किंवा त्यापेक्षा अधिक सामने जिंकून व्हाईट वॉश नाही देऊ शकला.