गर्लफ्रेन्ड अनुष्काला लाडाने या नावाने हाक मारतो विराट

टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे कपल नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहतं. नुकतीच अनुष्का विराटला भेटायला श्रीलंकेला गेली होती.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Aug 18, 2017, 09:45 AM IST
गर्लफ्रेन्ड अनुष्काला लाडाने या नावाने हाक मारतो विराट title=

मुंबई : टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे कपल नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहतं. नुकतीच अनुष्का विराटला भेटायला श्रीलंकेला गेली होती.

या दोघांचं अफेअर जगजाहीर आहे. त्यामुळे त्यांच्या या अफेअरबद्दल नेहमीच विविध चर्चा होताना दिसतात. आता या दोघांच्या आणखी एका खास गोष्टीचा खुलासा झाला आहे. 

१५ ऑगस्टला अनुष्का विराटला भेटण्यासाठी श्रीलंकेला गेली होती. इथे दोघांनी सोबत काही वेळ घालवला. इथे असताना दोघांनी काही फॅन्ससोबत फोटोही काढलेत. यादरम्यान एका फॅनला विराटची एक गोष्ट माहिती पडली. विराट अनुष्काला लाडाने काय हाक मारतो, हे या फॅनला कळालं. 

मग काय या फॅनने याचा खुलासा केला नसता तर नवल. विराट कोहली अनुष्काला लाडाने Nushkie (नुष्की) अशी हाक मारतो. मस्तय ना? फॅन या दोघांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत हा खुलासा केलाय. त्यानंतर काही मिनिटातच हे नाव सोशल मीडियात व्हायरल झालं. तसे या विराट आणि अनुष्काच्या जोडीला Virushka (विरुष्का) असे म्हटले जाते.