टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे मुंबईतील घर आणि सेल्फी

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने  आपल्या नव्या घराची पाहाणी केली. यावेळी त्याने घरातूनच समुद्र दर्शन घेतले.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 8, 2018, 11:16 PM IST
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे मुंबईतील घर आणि सेल्फी

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने आपल्या नव्या घराची पाहाणी केली. यावेळी त्याने घरातूनच समुद्र दर्शन घेतले. त्यांने घरातून काढलेला सेल्फी ट्विटरवर शेअर  केलाय. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहलीला विश्रांती 

विराट कोहली याने अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत विवाह केला. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. त्याने हा दौरा आपल्या बॅटने चांगलाच गाजवला. आता टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. मात्र, विराट कोहलीला विश्रांती देण्यात आलेय. त्यामुळे विराट सध्या काय करतोय, याची चर्चा आहे.

 सेल्फी ट्विटरवर केला शेअर

मात्र, तो मुंबईत आहे. तो आपल्या नव्या घराची पाहाणी करतोय.  विराटचे वरळीत ओंमकार टॉवरमध्ये त्याचे भव्य घर आहे. याच घराच्या गॅलरीतून त्याने आपला सेल्फी काढलाय. विराट कोहलीने आपल्या वरळी येथील नव्या घरातून काढलेला सेल्फी ट्विटरवर केला शेअर.