टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मागील 2 महिन्यांपासून सुरु असलेल्या सिरीजचा आज शेवटचा सामना आहे. न्यू लँड्समध्ये हा सामना रंगणार आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 24, 2018, 04:02 PM IST
टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी title=

केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मागील 2 महिन्यांपासून सुरु असलेल्या सिरीजचा आज शेवटचा सामना आहे. न्यू लँड्समध्ये हा सामना रंगणार आहे.

करो वा मरोची स्थिती

टीम इंडियाजवळ आज एकाच दौऱ्यात 2 सीरीज जिंकण्य़ाची संधी आहे. वनडे सीरीजवर 5-1 ने विजय मिळवल्यानंतर 3 टी-20 पैकी 1 सामना भारताने तर 1 आफ्रिकेने जिंकला आहे. आज जो संघ विजयी होईल तो संघ सीरीजपण जिंकेल. 

भारतीय टीमने जोहान्सबर्गमध्ये पहिला सामना 28 रनने जिंकला होता. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने भारतावर 6 विकेट्सने विजय मिळवला. 

इतिहास रचण्याची संधी

आज जर टीम इंडिया हा सामना जिंकते तर दक्षिण आफ्रिकामध्ये पहिल्यांदा असं होईल की भारताने वनडे  आणि टी-20 सीरीज दोन्ही आपल्या खिशात घातली.  सचिन, गांगुली आणि धोनी कर्णधार असतांना अजून असा कारनामा होऊ शकलेला नाही.