टीम इंडियाचे खेळाडू करणार आता बिझिनेस क्लासमधून प्रवास

भारतीय संघाचे खेळाडू आता इकॉनॉमी क्लासऐवजी बिझनेस क्लासमध्ये प्रवास करतील. या संदर्भात खेळाडूंनी बीसीसीआयकडे मागणी केली होती. जे क्रिकेट बोर्डाने स्विकारली आहे. 

Updated: Nov 14, 2017, 10:36 AM IST
टीम इंडियाचे खेळाडू करणार आता बिझिनेस क्लासमधून प्रवास title=

मुंबई : भारतीय संघाचे खेळाडू आता इकॉनॉमी क्लासऐवजी बिझनेस क्लासमध्ये प्रवास करतील. या संदर्भात खेळाडूंनी बीसीसीआयकडे मागणी केली होती. जे क्रिकेट बोर्डाने स्विकारली आहे. 

विराट कोहलीसह भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी बोर्डाकडे इकॉनॉमी क्लासच्या बोर्डिंगच्या आव्हानांबाबत तक्रार केली होती. काही खेळाडूंनी त्यांना गर्दी घेरा घालते अशी तक्रार केली होती. तर काही उंच खेळाडूंनी अशी तक्रार केली होकी की इकॉनॉमी क्लासमध्ये बसतांना पायाला त्रास होतो.

विमानाच्या आसनावर बसून त्यांच्या पायाला खूप त्रास होतो. यापूर्वी बिझनेस क्लासमध्ये प्रवास करण्याची सोय फक्त टीमचा कर्णधार आणि प्रशिक्षकाला होता. बऱ्याच दिवसापूर्वी बीसीसीआयकडे स्वत:चं विमान असलं पाहिजे असं कपिल देव यांनी म्हटलं आहे. कपिल देव यांनी म्हटलं की, यामुळे क्रिकेटर्सना सहजपणे प्रवास करता येईल. बोर्डाने पाच वर्षांपूर्वी ही योजना अंमलात आणली पाहिजे होती.

खेळाडूंची मागणी बीसीसीआयने (CoA) सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत मंजुर केली आहे.