रमाकांत आचरेकर यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार

ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  

Updated: Jan 2, 2019, 08:14 PM IST
रमाकांत आचरेकर यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार title=
Pic Courtesy : BCCI

मुंबई : ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं दिर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतल्या दादरमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. उद्या सकाळी दादर स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी त्यांचे शिष्य सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे निधन

१९३२ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणमध्ये त्यांचा जन्म झाला होता. अनेक क्रिकेटपटूंना घडवणाऱ्या रमाकांत आचरेकर यांच्याकरिता, मुंबईतले शिवाजी पार्क मैदान ही जणू कर्मभूमीच होती. त्यांनी शिवाजी पार्कवर कामथ मेमोरियल क्रिकेट क्लबची स्थापना केली होती. १९९० मध्ये क्रीडा क्षेत्रातला मानाचा द्रोणाचार्य पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. तर २०१० मध्ये पद्मश्री पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आले होते.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, अजित आगरकर, या आणि इतरही क्रिकेटपटूंना रमाकांत आचरेकर यांनी क्रिकेटचे धडे दिले होते. १९९० मध्ये क्रीडा क्षेत्रातला मानाचा द्रोणाचार्य पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता. तर २०१० मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं होतं. उद्या सकाळी दादर स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.