...तर भारत वनडेमध्येही पहिल्या क्रमाकांवर पोहोचणार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडेच्या सीरिजला रविवारपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Sep 14, 2017, 10:38 PM IST
...तर भारत वनडेमध्येही पहिल्या क्रमाकांवर पोहोचणार

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडेच्या सीरिजला रविवारपासून सुरुवात होणार आहे. ही सीरिज जिंकून वनडे क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याचा प्रयत्न दोन्ही टीम करतील.

आयसीसीच्या सध्याच्या वनडे क्रमवारीमध्ये भारत ११७ पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियाकडेही ११७ पॉईंट्स आहेत पण रेटिंग्स चांगलं असल्यामुळे कांगारूंचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. ११९ पॉईंट्ससह दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमांकावर आहे.

वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान होण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाला ४-१नं ही वनडे सीरिज हरवावी लागेल. तर ऑस्ट्रेलियालाही पहिल्या क्रमांकावर पोहचण्यासाठी अशीच कामगिरी करावी लागेल. भारतानं श्रीलंकेसारखच ऑस्ट्रेलियालाही ५-०नं हरवलं तर भारताकडे १२२ पॉईंट्स होतील तर ऑस्ट्रेलिया ११३ पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर जाईल. ऑस्ट्रेलियाला भारतानं ३-२नं हरवलं तर मात्र भारताला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागेल.