VIDEO: दुहेरी शतकांचा ‘बादशाह’ रोहितचा सिक्सर मारण्यातही रेकॉर्ड

धर्मशाला वनडे सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाने श्रीलंकेसमोर मोहालीत ३९३ रन्सचं टारगेट ठेवलं आहे.

Updated: Dec 13, 2017, 06:21 PM IST
VIDEO: दुहेरी शतकांचा ‘बादशाह’ रोहितचा सिक्सर मारण्यातही रेकॉर्ड title=

मुंबई : धर्मशाला वनडे सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाने श्रीलंकेसमोर मोहालीत ३९३ रन्सचं टारगेट ठेवलं आहे. यात रोहित शर्माने नाबाद २०८ रन्स करत तिस-यांदा दुहेरी शतक करण्याचा रेकॉर्ड केलाय. पहिल्यांदा फलंदाजी करत टीम इंडियाने ५० ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून ३९२ रन्स केलेत. आजच्या या सामन्यात रोहित शर्मा हिरो ठरला आहे. 

श्रेयस अय्यरचं शतक हुकलं

रोहित शर्मासोबतच आपल्या करिअरचा दुसरा वनडे सामना खेळणारा श्रेयस अय्यर पहिल्या शतकापासून वंचित राहिला. तो ८८ रन्स करून आऊट झाला. तर रोहित शर्माने वनडेत श्रीलंकेविरूद्ध हे दुसरं दुहेरी शतक लगावलं आहे. 

जझीरनंतर दुस-या क्रमांकावर

रोहित शर्माचं दुहेरी शतक कमाल होतं. त्याने आधी ११७ बॉल्समध्ये १०० रन्स केले. मात्र दुसरे १०० रन्स त्याने केवळ ३६ बॉल्समध्ये पूर्ण केले. एका ओव्हरमध्ये तर त्याने ४ सिक्सर लगावले. यासोबतच तो वनडे सामन्यात एकाच ओव्हरमध्ये चार सिक्सर लगावणारा जहीर खाननंतर दुसरा खेळाडू बनला आहे.  

सर्वाधिक सिक्सर लगावण्यातही पहिला

रोहित शर्मा एका इनिंगमध्ये सर्वाधिक सिक्सर लगावण्यातही भारतीयांमध्ये सर्वात पुढे आहे. याआधी रोहित शर्माने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध एका इनिंगमध्ये १६ सिक्सर लगावले होते. मोहाली वनडेमध्ये त्याने १२ सिक्सर लगावले आहेत. त्याच्यानंतर सर्वाधिक सिक्सर मारण्यात महेंद्र सिंह धोनीचा नंबर लागतो. त्याने २००५ मध्ये श्रीलंके विरूद्ध १० सिक्सर लगावले होते.

हे करणारा जगातला एकुलता एक खेळाडू

रोहित शर्मा हा तिनदा दुहेरी शतक लगावणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिला फलंदाज आहे. वनडे सामन्यात तसाही तो सर्वात जास्त दुहेरी शतकं लगावणारा खेळाडू आहे. याआधी त्याने दोनदा दुहेरी शतक लगावले आहे.