विराट-अनुष्काच्या लग्नातील रितीरिवाजाचे व्हिडिओ आले समोर

टीम इंडियाला कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह नुकताच इटलीमध्ये पार पडला.

Updated: Dec 11, 2017, 11:47 PM IST
विराट-अनुष्काच्या लग्नातील रितीरिवाजाचे व्हिडिओ आले समोर title=

फ्लोरेंस (इटली): टीम इंडियाला कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह नुकताच इटलीमध्ये पार पडला.

सध्या दोघांच्या लग्नाचीच सगळीकडे चर्चा रंगली आहे. हे लग्न कसं झालं हे जाणून घेण्याची उत्सुकता दोघांच्याही चाहत्यांमध्ये बघायला मिळत आहे. आधी फोटो आणि नंतर काही या लग्नाचे व्हिडिओ समोर आले आहेत. 

विराटने स्वत: ट्विट करून या लग्नाची माहिती दिली. यावर त्याने लिहिले की, आज आम्ही दोघांनी नेहमीसाठी ऎकमेकांच्या प्रेमात हरवून जाण्याचा निश्चय केलाय. आम्हाला हे तुम्हाला सांगायचं आहे. मित्र, चाहते यांच्या शुभेच्छांमुळे हा दिवस आणखीच चांगला झाला आहे. आमच्या प्रवासाचा महत्वाचा भाग राहण्यासाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद.