VIDEO : ..जेव्हा सुरक्षा कवच तोडून प्रेक्षकानं घेतली कोहलीकडे धाव

एका प्रेक्षकानं अचानक बॅरिकेड ओलांडून कोहलीच्या दिशेनं धाव घेतली

Updated: Oct 12, 2018, 03:49 PM IST
VIDEO : ..जेव्हा सुरक्षा कवच तोडून प्रेक्षकानं घेतली कोहलीकडे धाव  title=

हैदराबाद : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी एका फॅननं सगळी सुरक्षा धाब्यावर बसवल्याचं चित्र नुकतंच पाहायला मिळालं. वेस्ट-इंडीज विरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवश शुक्रवारी एक प्रेक्षक सरळ मैदानातच कॅप्टन विराट कोहलीपर्यंत जाऊन पोहचला. 

सकाळच्या सत्रातला तासभर झाला असेल... एका प्रेक्षकानं अचानक बॅरिकेड ओलांडून कोहलीच्या दिशेनं धाव घेतली. याचा अंदाजा सुरक्षा यंत्रणेलाही नसल्यानं तेही पहिल्यांदा गोंधळले. एव्हाना या व्यक्तीनं विराट कोहलीसोबत सेल्फी काढण्याची आपलं स्वप्न पूर्ण करून घेतलं. 

विराट कोहली या व्यक्तीपासून वाचण्याचा प्रयत्न करताना दिसला. त्यानंतर सुरक्षा दल त्याला बाहेर घेऊन जाताना दिसले. स्टेडियममध्ये बसलेल्या काही प्रेक्षकांनी हे सगळं दृश्यं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं... आणि सोशल मीडियावरही शेअर केलंय.

यापूर्वी राजकोटमध्येही पहिल्या टेस्ट मॅच दरम्यान अशा घटना घडल्या होत्या... यावेळी दोन दर्शक सुरक्षा कवच तोडून मैदानात घुसले होते... आणि त्यांनी विराट कोहलीसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला होता.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Two fanboys step into the ground to take selfie with @virat.kohli

A post shared by V I R A T K O H L I (@viratkohliplanet) on