रन आऊट होऊनही विराट कोहलीने केला हा रेकॉर्ड नावावर!

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली साऊथ आफ्रिकेसोबत ५ व्या सामन्यात भलेही दमदार खेळू शकला नाही. तरीही त्याने आपल्या नावावर एक रेकॉर्ड कायम केलाय. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 13, 2018, 08:37 PM IST
रन आऊट होऊनही विराट कोहलीने केला हा रेकॉर्ड नावावर!

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली साऊथ आफ्रिकेसोबत ५ व्या सामन्यात भलेही दमदार खेळू शकला नाही. तरीही त्याने आपल्या नावावर एक रेकॉर्ड कायम केलाय. 

काय आहे रेकॉर्ड?

६ सामन्यांच्या वन डे सीरिजमध्ये आत्तापर्यंत दमदार बॅटींग करत १४३ च्या सरासरीने त्याने ४२९ रन्स केले आहेत. साऊथ आफ्रिकेसोबत त्यांच्याच देशात ४०० रन्स पूर्ण करणारा विराट हा पहिला भारतीय खेळाडू आहे. 

विराटसोबत शिखरचीही दमदार खेळी

विराट कोहलीने आत्तापर्यंत या सीरिजमध्ये ३५ फोर आणि ४ सिक्सर लगावले आहेत. इतकेच नाही तर २ शतकंही झळकावले आहेत. विराटसोबतच शिखर धवनने सुद्धा या सीरिजमध्ये ३०० रन्सचा आकडा पूर्ण केलाय. त्यांनी आत्तापर्यंत ७६.२५ च्या सरासरीने ३०५ रन्स केले आहेत. यात त्याने ४५ फोर आणि २ सिक्सर लगावले आहे. पोर्ट एलिजाबेथ मैदानावर ५व्या वनडे सामन्यात विराट केवळ ३६ रन्स केले. 

सौरवच्या नावावर होता रेकॉर्ड

साऊथ आफ्रिकेत सर्वाधिक रन्स टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने केले होते. त्याने १९९९ मध्ये २८५ रन्स केले होते. त्यानंतर कुणीही इतके रन्स करू शकले नव्हते. 

विराटकडे आहे ही संधी

जर विराट कोहलीने सीरिजमध्ये ५०० रन्स पूर्ण केले त्याच्याकडे एक मोठी संधी आहे. जर तो असे करू शकला तर असे करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरेल. वन डे सीरिज किंवा आयसीसी टूर्नामेंटमध्ये भारतासाठी सचिन तेंडुलकरने दोनदा ५०० पेक्षा जास्त रन्स केले आहेत. सचिनने वर्ल्ड कप २००३ मध्ये ६७३ रन्स केले होते तर वर्ल्ड कप १९९५-९६ मध्ये ५२३ रन्स केले होते. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close