रोहितवर भडकला विराट, पाहा काय झालं मैदानात

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये रन धावताना पुन्हा एकदा गैरसमज झाले.

Updated: Feb 13, 2018, 11:12 PM IST
रोहितवर भडकला विराट, पाहा काय झालं मैदानात

पोर्ट एलिझाबेथ : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मामध्ये रन धावताना पुन्हा एकदा गैरसमज झाले. या गैरसमजाचा फटका विराट कोहलीला बसल्यामुळे तो रन आऊट झाला. रन आऊट झाल्यावर विराट कोहली रोहित शर्मावर भडकल्याचं पाहायला मिळालं.

रोहित शर्माबरोबर खेळत असताना रन आऊट व्हायची कोहलीची ही काही पहिली वेळ नाही. याआधी रोहितबरोबर खेळत असताना विराट ५ वेळा रन आऊट झाला आहे.

१ वेस्ट इंडिजविरुद्ध २०११ साली झालेल्या मॅचमध्ये विराट रन आऊट झाला. यावेळी रोहितनं ५७ रन्स केले.

२ २०१३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये रोहित आणि विराट एकत्र खेळत होते पण यावेळीही विराट शून्यवर रन आऊट झाला. या मॅचमध्ये रोहितनं २०९ रन्स केले.

३ २०१४ साली श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये हे दोघं मैदानात होते. या मॅचमध्ये विराट ६६ रन्सवर आऊट झाला. या मॅचमध्ये रोहित शर्मानं वनडे क्रिकेटच्या इतिहासातला सर्वाधिक स्कोअर २६४ रन्स केल्या.

४ २०१६ साली रोहितबरोबर बॅटिंग करत असताना विराट चौथ्यांदा रन आऊट झाला. या मॅचमध्ये रोहितनं १२४ रन्स केले.

५ आजच्या मॅचमध्येही रोहितबरोबर बॅटिंग करत असताना विराट रन आऊट झाला. या मॅचमध्ये रोहितनं ११५ रन्सची खेळी केली. 

रोहितवर भडकला विराट

 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close