ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाने म्हटले, कोहलीला 'या' ऑस्ट्रेलियन फलंदाजांपेक्षा श्रेष्ठ...

ऑस्ट्रेलिया सुपरस्टार मायकल हसीदेखील विराटचा मोठा चाहता आहे. 

Pravin Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 9, 2018, 10:51 PM IST
ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाने म्हटले, कोहलीला 'या' ऑस्ट्रेलियन फलंदाजांपेक्षा श्रेष्ठ...

नवी दिल्ली : विराट कोहलीचे फॅन्स साऱ्या जगभरात आहेत. या लिस्टमध्ये वसीम अक्रम आणि जावेद मियादाद सारखे दिग्गज क्रिकेटर्सही आहेत.

यामध्ये आणखी एका चाहत्याची भर पडली आहे. ऑस्ट्रेलिया सुपरस्टार मायकल हसीदेखील विराटचा मोठा चाहता आहे.

बेस्ट बॅट्समन 

विराट हा स्टीव स्मिथ आणि डेविड वॉर्नरपेक्षा श्रेष्ठ असल्याचे मायकल हसीने म्हटले आहे. आइस क्रिकेट टुर्नामेंटदरम्यान माध्यमांशी त्याने संवाद साधला.

त्यावेळी सध्याच्या घडीला विराट हा स्‍टीव स्मिथ, जो रूट, केन विलियम्स और डेविड वॉर्नरपेक्षा चांगला बॅट्समन असल्याचे त्याने म्हटले.

सर्व रेकॉर्ड तोडेल 

विराट कोहली हा रेकॉर्ड ब्रेकिंग खेळाडू आहे. नवनवीन रेकॉर्ड बनविणे त्याला आवडतं. विराट कोहली अशाप्रकारे बॅटींग करत राहीला तर सर्व रेकॉर्ड त्याच्याच नावे होतील असेही मायकलने सांगितले. 
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सिरिजमध्ये त्याने २ शतक लगावले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या शतकांची संख्या ३४ झाली आहे.