१३० रन्स करताच विराट करणार हा कारनामा, जो फक्त विवियन रिचर्ड्सने केलाय

क्रिकेटच्या दुनियेतील फलंदाजीचे सर्वच रेकॉर्ड एक एक करत विराट कोहली सर्वच रेकॉर्ड तोडत आहेत. त्याचा सध्याचा  फॉर्म पाहता कुणीही सांगू शकणार नाही की, तो कोणता रेकॉर्ड करणार. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 20, 2018, 03:38 PM IST
१३० रन्स करताच विराट करणार हा कारनामा, जो फक्त विवियन रिचर्ड्सने केलाय title=

नवी दिल्ली : क्रिकेटच्या दुनियेतील फलंदाजीचे सर्वच रेकॉर्ड एक एक करत विराट कोहली सर्वच रेकॉर्ड तोडत आहेत. त्याचा सध्याचा  फॉर्म पाहता कुणीही सांगू शकणार नाही की, तो कोणता रेकॉर्ड करणार. 

काय आहे रेकॉर्ड?

आफ्रिकेच्या मैदानात त्याची बॅट प्रत्येक दिवशी एक रेकॉर्ड करत आहे. आता तो अशा एका रेकॉर्डकडे पुढे जात आहे जो आत्तापर्यंत केवळ वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांनीच केलाय. एका दौ-यात १ हजारांपेक्षा जास्त रन्स करण्याचा कारनामा त्यांनी एकदा केला आहे. आता विराट कोहली या रेकॉर्डच्या जेवळ आहे. 

किती केलेत विराटने रन्स?

आफ्रिकेत वनडे सीरिजच्या ६ सामन्यांमध्ये विराट कोहलीने ५५८ रेकॉर्ड रन्स केले आहेत. याआधी पहिल्या टेस्ट सीरिजमध्ये त्याने २८६ रन्स केले होते. पहिल्या टी-२० सामन्यात विराटने २६ रन्स केलेत. यानुसार आफ्रिका दौ-यात विराटने आत्तापर्यंत ८७९(५५०+२८६+२६) रन्स केलेत. आता शिल्लक राहिलेल्या दोन टी-२० सामन्यांमध्ये त्याने १३० रन्स केलेत तर तो एका दौ-यात १ हजार रन्स करण्याचा रेकॉर्ड करेल. 

कोणत्या दौ-यात केला हा कारनामा?

विवियन रिचर्ड्सनंतर एका दौ-यात १ हजारपेक्षा जास्त रन्स करणारा विराट जगातला दुसरा क्रिकेटर होईल. रिचर्ड्सने १९७६ च्या इंग्लंड दौ-यात १०४५ रन्स केले होते. त्यात दौ-यात त्यांनी टेस्ट सामन्यात ८२९ आणि वनडे मध्ये २१६ रन्स केले होते.