• MADHYA PRADESH

  BJP

  106BJP

  CONG

  115CONG

  BSP

  2BSP

  OTH

  7OTH

 • RAJASTHAN

  BJP

  72BJP

  CONG

  101CONG

  BSP

  6BSP

  OTH

  20OTH

 • CHHATTISGARH

  BJP

  18BJP

  CONG

  63CONG

  JCC+

  8JCC+

  OTH

  1OTH

 • TELANGANA

  TRS

  87TRS

  CONG+

  22CONG+

  BJP

  1BJP

  OTH

  9OTH

 • MIZORAM

  BJP

  1BJP

  CONG

  5CONG

  MNF

  26MNF

  OTH

  8OTH

गेल्या ४ वर्षांपासून विराटने खाल्ला नाही त्याचा आवडता 'हा' पदार्थ!

भारताचा माजी क्रिकेटपटू  मोहम्मद कैफ याने फिटनेसची व्याख्या बदलली तर कर्णधार विराट कोहलीने फिटनेसला एका नवा दृष्टिकोन दिला आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 10, 2017, 05:53 PM IST
गेल्या ४ वर्षांपासून विराटने खाल्ला नाही त्याचा आवडता 'हा' पदार्थ!

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू  मोहम्मद कैफ याने फिटनेसची व्याख्या बदलली तर कर्णधार विराट कोहलीने फिटनेसला एका नवा दृष्टिकोन दिला आहे. सध्या विराट कोहली जगातील सर्वात फिट खेळाडूंपैकी एक आहे. फिटनेस म्हणजे केवळ जिममध्ये घाम गाळणे नाही तर दिवसभरात तुम्ही काय काय खाता हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

जेव्हा क्रिकेटचा सामना नसतो तेव्हा रोज विराट दिवसातील ४ तास जिममध्ये असतो आणि त्याचबरोबर तो त्याच्या डाएट देखील काटेकोरपणे पाळतो.

अलीकडेच एका चॅट शो मध्ये त्याचे फिटनेसबद्दलचे प्रेम दिसून आले. फिट राहण्यासाठी त्याने गेल्या चार वर्षांपासून बटर चिकन खाल्लेले नाही. त्याचबरोबर गोड पदार्थांपासून देखील तो लांबच राहतो. 

विराटने सांगितले की, त्याच्या दिवसाची सुरुवात ३ अंड्यांच्या ऑम्लेटने होते. त्याच्यासोबत तो पालक, चीज देखील घेतो. पपई, टरबूज ही फळे अवश्य घेतो आणि पेयांमध्ये ग्रीन टी विथ लेमन.

कॅलरीज नियंत्रित ठेवण्याच्या अनुषंगाने त्याचा डाएट चार्ट ठरवण्यात आला आहे. दुपारी जेवणात तो ग्रिल चिकन, मॅश पोटॅटो, स्पिन्च आणि व्हेजीस खातो. आवश्यकतेनुसार मसल्स वाढण्यासाठी आहारात रेड मीटचे प्रमाण वाढवण्यात येते. 
रात्री झोपण्यापूर्वी तो हलका आहार घेणे पसंत करतो. सी फूड घेण्यावर त्याचा भर असतो. डाएट मात्र काटेकोरपणे पाळतो, असे तो म्हणाला. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close