विराटचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार चर्चेत

भारताचा कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो सध्या नेटकऱ्यांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय.

Updated: Jun 25, 2017, 03:51 PM IST
विराटचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार चर्चेत title=

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो सध्या नेटकऱ्यांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय.

विराटच्या या फोटोवर सोशल मीडियावर तर अनेकांनी भन्नाट कॅप्शन देणे सुरु केलेय. खिडकीतून आत वाकून पाहत असतानाचा हा फोटो आहे. 

नेमका विराट खिडकीत डोकावून काय पाहत असावा. यावर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीये. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभवामुळे भारतीय क्रिकेट चाहते नाराज आहेत. मात्र या मजेदार फोटोमुळे मात्र सोशल मीडियावर हास्याची लाट पसरलीये.