'या' फोटोवरून विरूष्का झाले ट्रोल

इटलीमध्ये गुपचूप लग्न, भारतामध्ये दोन मोठी रिसेप्शन दिल्यानंतर विराट कोहली आता पुन्हा क्रिकेटमध्ये परतला आहे. 

Updated: Jan 3, 2018, 04:40 PM IST
'या' फोटोवरून विरूष्का झाले ट्रोल

मुंबई : इटलीमध्ये गुपचूप लग्न, भारतामध्ये दोन मोठी रिसेप्शन दिल्यानंतर विराट कोहली आता पुन्हा क्रिकेटमध्ये परतला आहे. 

 जानेवारीपासून सुरू होणार्‍या सामन्यांमध्ये विराट भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार आहे.  

सेल्फी केले ट्विट  

विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट संघासोबत अनुष्का शर्मादेखील आहे. सामना सुरू होण्यापूर्वी विरूष्का दक्षिण आफ्रिकेमध्ये फिरताना दिसत आहेत. विराट आणि अनुष्काने नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास सेल्फी   १ जानेवारीला ट्विट केला होता. त्यानंतर आज ३ जानेवारीलादेखील समुद्र किनारी फिरल्यानंतर त्यांनी एक फोटो ट्विट केला आहे.  

मात्र दोन्ही फोटोंमध्ये विराट कोहलीने एकच शर्टच घातल्याने ट्विटरकरांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.  

 

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ५० %  ऑफ अशा सेलमध्ये विराट आणि अनुष्का शर्मा खरेदी करत असल्याचे फोटो व्हायरल होत होते. त्यामुळे क्रिएटीव्हिटीला चालना देत अनेकांनी विरूष्काची टर उडवली आहे.