'दक्षिण आफ्रिकेत आल्यावर कोहलीची टीम दिशाहीन झाली'

दक्षिण आफ्रिकेचा माजी फास्ट बॉलर शॉन पोलॉकनं भारतीय टीमच्या दृष्टीकोनावर टीका केली आहे. टेस्ट सीरिजदरम्यान भारतीय टीमची प्राथमिकता आणि दृष्टीकोनावर पोलॉकनं आक्षेप घेतले आहेत.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Feb 15, 2018, 08:47 PM IST
'दक्षिण आफ्रिकेत आल्यावर कोहलीची टीम दिशाहीन झाली' title=

पोर्ट एलिजाबेथ : दक्षिण आफ्रिकेचा माजी फास्ट बॉलर शॉन पोलॉकनं भारतीय टीमच्या दृष्टीकोनावर टीका केली आहे. टेस्ट सीरिजदरम्यान भारतीय टीमची प्राथमिकता आणि दृष्टीकोनावर पोलॉकनं आक्षेप घेतले आहेत.

भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आला तेव्हा त्यांची टीम मजबूत असेल असं मला वाटत होतं. पण त्यांच्या टेस्ट सीरिजमधल्या कामगिरीमुळे मी निराश आहे, असं पोलॉक म्हणालाय.

वनडे सीरिज जिंकून भारत समाधानी आहे का? भारताची प्राथमिकता टेस्ट सीरिज जिंकणं पाहिजे होतं. टेस्ट सीरिजच्या तयारीसाठी त्यांनी दक्षिण आफ्रिकेत पहिलेच येणं अपेक्षित होतं. देशाबाहेर टेस्ट सीरिज जिंकणं तुमचं लक्ष्य असेल तर टेस्ट क्रिकेटला प्राथमिकता दिली पाहिजे, असा सल्ला पोलॉकनं दिला आहे.

लागोपाठ ९ टेस्ट सीरिज जिंकून १०वी टेस्ट सीरिज जिंकण्याची संधी भारताला होती. ऑस्ट्रेलियानंही लागोपाठ ९ टेस्ट सीरिज जिंकल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज भारत जिंकला असता तर लागोपाठ १० टेस्ट सीरिज जिंकून वर्ल्ड रेकॉर्ड भारताच्या नावावर झाला असता.

वनडे सीरिजमध्ये मात्र भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. ६ वनडेच्या सीरिजमध्ये भारतानं ४-१ची विजयी आघाडी घेतली आहे. २६ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारतानं दक्षिण आफ्रिकेत वनडे सीरिज जिंकली आहे.