या मजेदार ट्विटमधून ख्रिस गेलला दिल्या सेहवागने वाढदिवसाच्या शुभेच्छा

टी२० मॅचमध्ये धमाकेदार खेळी करणारा ख्रिस गेल क्रिकेट सार्‍याच प्रकारांमध्ये अगदी दमदार कामगिरी करतो. 

Updated: Sep 21, 2017, 11:25 PM IST
या मजेदार ट्विटमधून ख्रिस गेलला दिल्या सेहवागने वाढदिवसाच्या शुभेच्छा  title=

मुंबई : टी२० मॅचमध्ये धमाकेदार खेळी करणारा ख्रिस गेल क्रिकेट सार्‍याच प्रकारांमध्ये अगदी दमदार कामगिरी करतो. 

ख्रिस गेलच्या तुफान बॅटींगचे अनेक चाहते आहेत.  आज २१ सप्टेंबर रोजी ख्रिस गेल त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. ख्रिसच्या अनेक चाहत्यांप्रमाणेच भारतीय क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनेदेखील गेलला ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र सेहवागचा अंदाज थोडा हटके होता. 

'आ बैल मुझे मार' या म्हणीमध्ये ख्रिस गेलच्या नावाचा थोडा वापर करून ट्विस्ट देत त्याने गेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

गेलचं करिअर कसं ? 
सप्टेंबर १९९९मध्ये गेलने भारताविरूद्धच्या सामन्यामधून एक दिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
२०००साली झिम्बावेच्या विरुद्ध टेस्ट मॅच मध्ये पदार्पण केले. 
टेस्ट मॅचमध्ये गेलने १०३ सामन्यांमध्ये ७२१४ रन्स बनवले. यामध्ये १५ शतकं ठोकली. तसेच दोनदा ट्रिपल सेन्चुरीदेखील मारली आहे. 
एकदिवसीय क्रिकेटमध्ये २७० सामन्यांमध्ये ९२५८ धावा केल्या असून २२ शतकं ठोकली आहेत. 
टी २० करिअरमध्ये गेलने ५२ सामन्यांमध्ये १५७७  धावा बनवल्या. त्यामध्ये २ शतकंठोकली आहेत. 
गेलने टेस्टमध्ये ७३,वनडे मध्ये १६३ तर टी २०मध्ये १७ विकेट्स घेतल्या आहेत.