भारतीय बॉलिंगपुढे वेस्ट इंडिजचं लोटांगण, फक्त १०४ रनवर ऑल आऊट

भारताविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजचा फक्त १०४ रनवर ऑल आऊट झाला आहे.

Updated: Nov 1, 2018, 03:57 PM IST
भारतीय बॉलिंगपुढे वेस्ट इंडिजचं लोटांगण, फक्त १०४ रनवर ऑल आऊट title=

तिरुवनंतपुरम : भारताविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजचा फक्त १०४ रनवर ऑल आऊट झाला आहे. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगाशी आला. सुरुवातीपासूनच भारतीय बॉलरनी वेस्ट इंडिजला धक्के दिले. भारताकडून रवींद्र जडेजानं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि खलील अहमदला प्रत्येकी २-२ विकेट घेण्यात यश आलं. भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादवला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.

वेस्ट इंडिजकडून कर्णधार जेसन होल्डरनं सर्वाधिक २५ रन केले. तर मार्लोन सॅम्युअल्सला २४ रन करता आले. वेस्ट इंडिजचे तीन बॅट्समन शून्य रनवर आऊट झाले. ५ वनडे मॅचच्या या सीरिजमध्ये भारत २-१नं आघाडीवर आहे. तर एक मॅच टाय झाली आहे. ही मॅच जिंकली तर भारत सीरिज खिशात टाकेल.

घरच्या मैदानात भारताचा हा लागोपाठ सहावा वनडे सीरिज विजय असेल. ऑक्टोबर २०१५ पासून भारत घरच्या मैदानात एकही वनडे सीरिज हरलेला नाही. दक्षिण आफ्रिकेनं २०१५ मध्ये भारताला घरच्या मैदानात मात दिली होती. 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा