या खेळाडूचे 650 हून जास्त मुलींशी शारिरीक संबध, आत्मचरित्रात खुलासा

 आपले आत्मचरीत्र 'माइंड द विंडो-माय स्टोरी' स्वत:बद्दलच धक्कादायक खुलासे केले आहेत. 

Updated: Oct 11, 2018, 04:02 PM IST
या खेळाडूचे 650 हून जास्त मुलींशी शारिरीक संबध, आत्मचरित्रात खुलासा

मुंबई : क्रिकेट विश्वात कित्येक खेळाडू आपल्या रंगेल स्वभावासाठी ओळखले जातात. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वॉर्न, इंग्लंडचा स्टार बॅट्समन केविन पिटरसन, पाकिस्तानचा ऑलराऊंडर इमरान खान सारखे अनेक खेळाडू प्रसिद्ध आहेत. या सर्वांना मागे टाकत एक कॅरेबेयिन खेळाडू खूप पुढे गेलायं. वेस्ट विंडीजचा फास्ट बॉलर टीनो बेस्टने आपले आत्मचरीत्र 'माइंड द विंडो-माय स्टोरी' स्वत:बद्दलच धक्कादायक खुलासे केले आहेत. 

आपण आयुष्यात 500  ते 650 मुलींसोबत शारिरीक संबध ठेवल्याचे त्याने म्हटलंय.

आता खुद्द टीनोचं असं म्हणतोय तर शंका उपस्थित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

खासगी आयुष्यातील किस्से 

36 वर्षांच्या या क्रिकेटरने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत. एक बोल्ड खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. मी मुलींशी प्रेम करतो आणि मुली माझ्याशी, मी टक्कल असलेला जगातील बेस्ट ब्लॅक लुकिंग मनुष्य असल्याचे तो सांगतो.  लोक मला मस्करीत ब्लॅक ब्रेड पिट म्हणत असल्याचे त्याने सांगितले.

'जातो तिथे सेक्स'

आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल त्याने भरभरून लिहलंय. आपल्या पहिल्या प्रेमापासून एक मुलगी असल्याचेही तो सांगतो.

ब्रेकअप झाल्यानंतर आपल्याला सेक्स करण्याची सवय कशी लागली याबद्दलही तो सांगतो. वेस्ट इंडीज हा फास्ट बॉलर आपल्या आक्रमकपणासाठी ओळखला जातो.

टीनो बेस्ट हा इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर एंड्र्यू फ्लिंटॉफ आणि पाकिस्तानचा माजी कप्तान असलेल्या आफ्रिदीशी मैदानात भिडतानाही दिसलायं.

ज्या देशात खेळायला जातो तिथे मुलींसोबत शारिरीक संबंध ठेवत असल्याचे तो सांगतो.

टीनेने आपल्या करियरमध्ये 25 टेस्ट आणि 26 वनडे खेळल्या आहेत.

टेस्टमध्ये त्याच्या खात्यात 57 विकेट आहेत. वनडेमध्ये 34 विकेट्स त्याला मिळाल्या आहेत. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close