जेव्हा वानखेडेवर रोहित-रोहितऐवजी एबी-एबी ओरडू लागले चाहते

तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय जाहीर करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिविलियर्सची भारतात लोकप्रियता कमी नाहीये. 

Updated: May 24, 2018, 01:11 PM IST
जेव्हा वानखेडेवर रोहित-रोहितऐवजी एबी-एबी ओरडू लागले चाहते title=

मुंबई : तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय जाहीर करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिविलियर्सची भारतात लोकप्रियता कमी नाहीये. आयपीएल असो वा भारतात दक्षिण आफ्रिकेचा सामना त्याचे चाहते कुठेही त्यालाच सपोर्ट करतात. भारताविरुद्धच्या त्याच्या खेळीला भारतातील त्याचे चाहते तितकाच मोठा प्रतिसाद देतात. त्याला चीअर अप करतात. याची साक्ष खुद्द डिवियर्सचा मित्र विराट कोहलीने दिलीये. नुकताच एआयबीच्या एका व्हिडीओत विराट आणि एबी डिविलियर्स यांनी आयपीएलमधील किस्से ऐकवले. विराटने एबीबाबतचा एक रोचक किस्साही सांगितला. 

ऑक्टोबर २०१५मध्ये जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ एबी डिविलियर्सच्या नेतृत्वाखाली भारत दौऱ्यावर आला होता. सीरीजमधील शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तडाखेबाज फलंदाजी करताना ४३८ धावांचा डोंगर उभारला होता. यात क्विंटन डी कॉर, फाफ डू प्लेसिस आणि एबी डिविलियर्स यांनी शतके ठोकली होती. तर टीम इंडिया केवळ २२४ धावा करुन सर्वबाद झाली होती. २१४ धावांनी भारताचा पराभव झाला होता.

या सामन्याच्या आठवणी जाग्या करताना विराट म्हणाला, पहिल्या तीस षटकांमध्ये आम्ही जीव ओतून फिल्डिंग केली मात्र त्यानंतर गरज पडली नाही तर चेंडू सरळ स्टँडमध्ये जात होता. विराट म्हणाला. जेव्हा टीम इंडिया बॅटिंग करण्यासाठी आले तेव्हा रोहित शर्मा आणि शिखर धवन फलंदाजीसाठी आले. त्यांना पाहताच वानखेडेमधील प्रेक्षकांनी एबी एबी असे ओरडण्यास सुरुवात केली. रोहित मुंबईचाच होता त्याने मागे वळून इशाऱ्याने लोकांना विचारले काय आहे हे...तर ५० हजार लोक ओरडत होते एबी एबी...