महिला क्रिकेटर मितालीने तोडला सचिनचा रेकॉर्ड

भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राजने महिला वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरोधात ७१ रनची शानदार खेळी करत एक मोठा रेकॉर्ड बनवला आहे. मितालीने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये लागोपाठ ७ अर्धशतक ठोकल्याचा रेकॉर्ड बनवला आहे. मितालीने हा रेकॉर्ड करत सचिन तेंडुलकरला देखील मागे टाकलं आहे.

Updated: Jun 26, 2017, 01:44 PM IST
महिला क्रिकेटर मितालीने तोडला सचिनचा रेकॉर्ड title=

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राजने महिला वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरोधात ७१ रनची शानदार खेळी करत एक मोठा रेकॉर्ड बनवला आहे. मितालीने आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये लागोपाठ ७ अर्धशतक ठोकल्याचा रेकॉर्ड बनवला आहे. मितालीने हा रेकॉर्ड करत सचिन तेंडुलकरला देखील मागे टाकलं आहे.

भारतीय महिला क्रिकेट टीमने इंग्लंड विरोधात वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला. भारतीय टीमने ३५ रनने सामना जिंकला. या सामन्यात मिताली राजने ७१ रनची खेळी केली. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये लागोपाठ अर्धशतक ठोकण्याचा रेकॉर्ड जावेद मियांदादच्या नावे आहे. मियांदादने लागोपाठ ९ अर्धशतकं केली आहेत.