हरमनप्रीतच्या खांद्याला दुखापत, फायनलमध्ये खेळण्याबाबत साशंकता

आयसीसी वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या फायनल सामन्यासाठी अवघे काही तास उरलेत. यातच टीम इंडियासाठी बॅड न्यूज आलीये. 

Updated: Jul 22, 2017, 08:29 PM IST
हरमनप्रीतच्या खांद्याला दुखापत, फायनलमध्ये खेळण्याबाबत साशंकता title=

लंडन : आयसीसी वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या फायनल सामन्यासाठी अवघे काही तास उरलेत. यातच टीम इंडियासाठी बॅड न्यूज आलीये. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये १७१ धावांनी नाबाद खेळी साकारणारी धडाकेबाज क्रिकेटर हरमनप्रीत कौरच्या खांद्याला प्रॅक्टिसदरम्यान दुखापत झाली. 

सामन्यासाठी सराव करत असताना खांद्याला दुखापत झाल्याने ती पुढील सराव सत्रात भाग घेऊ शकली नाही. दरम्यान, कर्णधार मिताली राजने दुखापत लवकर बरी होईल अशी आशा व्यक्त केलीये.

खांद्याच्या दुखापतीमुळे कौर चिंतेत दिसली. दरम्यान, ती फायनलमध्ये खेळणार की नाही तसेच दुखापत कितपत गंभीर आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाहीये.