वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी

भारतीय महिला संघाने शनिवारी न्यूझीलंडचा १८६ धावांनी पराभव करत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. वर्ल्डकप जेतेपदाच्या दृष्टीने भारत केवळ दोन पावले दूर आहे.

Updated: Jul 16, 2017, 06:59 PM IST
वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी

डर्बी : भारतीय महिला संघाने शनिवारी न्यूझीलंडचा १८६ धावांनी पराभव करत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. वर्ल्डकप जेतेपदाच्या दृष्टीने भारत केवळ दोन पावले दूर आहे.

यातील भारताचा पहिला अडथळा आहे ऑस्ट्रेलियाचा. सेमीफायनलमध्ये भारताचा मुकाबला दिग्गज ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. 

या पराभवाचा बदला घेण्याची संधी भारताला सेमीफायनलमध्ये आहे. मात्र दिग्गज ऑस्ट्रेलियाला हरवणे तितके सोपे नाहीये. भारतीय संघाला सर्वच आघाड्यांवर चांगली कामगिरी करावी लागेल. 

गुरुवारी २० जुलैला भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होतेय. साखळी सामन्यातील झालेला पराभव विसरून विजय मिळवण्याच्या दृष्टीने भारत गुरुवारी मैदानात उतरले.