VIDEO : आजच्या दिवशीच केला होता युवराजने ‘तो’ कारनामा

१९ सप्टेंबर २००७ म्हणजे आजच्या दिवशीच ठिक १० वर्षांआधी युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात एक असा कारनामा केला होता, ज्यामुळे जगभरात त्याचा नावा डंका वाजला होता.

Updated: Sep 19, 2017, 12:03 PM IST
VIDEO : आजच्या दिवशीच केला होता युवराजने ‘तो’ कारनामा title=

नवी दिल्ली : १९ सप्टेंबर २००७ म्हणजे आजच्या दिवशीच ठिक १० वर्षांआधी युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात एक असा कारनामा केला होता, ज्यामुळे जगभरात त्याचा नावा डंका वाजला होता.

केवळ युवराजसाठीच नाही तर ९ सप्टेंबर ही तारीख क्रिकेटच्या इतिहासातही सोनेरी अक्षरांनी लिहिली गेली आहे. याच दिवशी युवराजने सहा बॉलवर सहा सिक्सर लगावले होते. 

टी-२० वर्ल्ड कप २००७ तील हा सामना होता. इंग्लंड आणि भारत यांच्यात हा सामना झाला होता. याच सामन्यात युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच ओव्हरमध्ये ६ सिक्सर लगावले होते. या सामन्यात युवराजने केवळ १२ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. ६ सिक्सर मारण्यासोबतच युवराजने सर्वात वेगवान अर्धशकत करण्याचा रेकॉर्डही आपल्या नावावर केला होता. हा रेकॉर्ड अजूनही त्याच्या नावावर आहे. 

युवराजने जेव्हा हा कारनामा केला तेव्हा एक ओव्हर आधीच इंग्लंडचा ऑलराऊंडर अ‍ॅन्ड्र्य़ू फ्लिंटॉफसोबत त्याचा वाद झाला होता. हा राग युवराजने नंतर ओव्हर घेऊन आलेल्या ब्रॉडवर काढला होता. युवराजने हा कारनामा सामन्याच्या १९व्या ओव्हरमध्ये केला होता. तेव्हा टीमचा स्कोर १७१ इतका होता. पुढील ३ मिनिटांनी युवराजच्या सहा सिक्सरमुळे हाच स्कोर ४ विकेट गमावून २१८ रन्स इतका झाला होता.  

९ वर्षांनी युवराजने सांगितलं ६ सिक्सर मारण्याचं गुपित

युवराजने एका मुलाखतीत सहा बॉलवर सहा सिक्सर मारण्याबाबतचा खुलासा केला होता. युवराजने सांगितले की, अ‍ॅन्ड्र्यू फ्लिंटॉफने त्याच्या एका शॉटला खराब म्हटले होते. त्यामुळे मला राग आला होता आणि मी त्याला काहीतरी बोललो. ते ऎकल्यावर फ्लिंटॉफने माझा गळा कापण्याची भाषा केली आणि बॅटने तुला मारणार असेही म्हणाला. त्यानंतर युवराजने फ्लिंटॉफचा सगळा राग स्टुअर्ट ब्रॉडवर काढला होता.