झहीर खान आणि सागरिका घाटगेच्या लग्नाची तारीख ठरली!

क्रिकेट आणि बॉलिवूड क्षेत्रातील सेलिब्रिटी एकत्र येऊन अनेक जोड्या बनल्या आहेत.

Updated: Sep 13, 2017, 02:27 PM IST
झहीर खान आणि सागरिका घाटगेच्या लग्नाची तारीख ठरली!

मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूड क्षेत्रातील सेलिब्रिटी एकत्र येऊन अनेक जोड्या बनल्या आहेत.

यामध्ये आता क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे ही रोमॅंटिक कपलदेखील लवकरच लग्नबंधनात अडणार आहे. 

२०१७ च्या वर्षअखेरीस झहीर आणि सागरिका लग्न करणार अशा बातम्या होत्या. मात्र नेमक्या तारखेबाबत दोघांकडूनही कोणतीच माहिती दिली जात नव्हती. मात्र एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार झहीर आणि सागरिका नोव्हेंबर २०१७ मध्ये विवाहबद्ध होतील. 

झहीर आणि सागरिकाचे लग्न दिमाख्यात होणार आहे. मुंबई-पुण्यात त्यांच्या लग्नाचे रिसेप्शनदेखील ठेवण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबर रोजी हे रिसेप्शनअसेल अशी माहिती मिळाली आहे. 
सागरिका आणि झहीर खानचा हा बहूप्रतिक्षित विवाहसोहळा नेमका कोठे होणार याबाबत अद्यापही कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. 

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियातून या रोमॅंटिक कपलने आपण एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा केला होता. भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगच्या लग्नातही ही जोडी एकत्र पोहचल्याने त्यांच्यामधील नात्यांबाबतच्या चर्चांना उधाण आले होते.