विनय आपटेंनी बोगस मतपत्रिका छापल्याचा मोहन जोशींचा आरोप

Last Updated: Tuesday, January 22, 2013, 18:16

नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदावरून वाद सुरू झाले आहेत. माजी अध्यक्ष मोहन जोशी यांनी विनय आपटेंवर गंभीर आरोप केले आहेत. विनय आपटेंनी बोगस मतपत्रिका छापल्याचा आरोप मोहन जोशींनी केला आहे.

डॉ. मोहन आगाशे मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष

Last Updated: Monday, October 15, 2012, 19:03

९३ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर मोहन आगाशे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बारामतीत होणाऱ्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

प्रशांत -कविताची धमाल जोडी ९ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर

Last Updated: Saturday, October 13, 2012, 21:09

प्रशांत दामले आणि कविता लाड ही जोडी ९ वर्षानंतर रंगभूमीवर एकत्र येतेय. प्रशांत दामले आणि कविता लाड यांची ही धम्माल कॉमेडी पुन्हा एकदा रंगमंचावर आपल्याला अनुभवता येणार आहे. ‘माझिया भावोजींना रित कळेना’ या नाटकातून रंगमंचावर सुपरहिट ठरलेली ही जोडी जवळपास ९ वर्षानंतर पुन्हा एकत्र येतेय.

`टॉम आणि जेरी` आता मराठीत?

Last Updated: Sunday, August 19, 2012, 22:51

एखादं नाटकं करायचं म्हटलं की अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं...मात्र नाटकाच्या पहिल्या प्रयोगालाच प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला की जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.

आता नाटकांपूर्वीही राष्ट्रगीत

Last Updated: Wednesday, August 15, 2012, 15:43

नाट्यगृहांमध्ये आता तिस-या घंटेबरोबर राष्ट्रगीताचे सूरही घुमणार आहेत. याची सुरुवात स्वातंत्र्यदिनानिमित्तानं पुण्यात झाली. प्रशांत दामलेंच्या सासू माझी ढासू या नाटकाच्या प्रयोगाआधी राष्ट्रगीत झालं आणि त्यानंतर नाटकाला सुरुवात झाली.

'परपुरुषा'बरोबर नेहा पेंडसे लवकरच रंगभूमीवर

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 14:17

अशोक समेळ लिखीत आणि दिग्दर्शित 'परपुरुष' हे नाटक येत्या २६ एप्रिलला रंगभूमीवर दाखल होतंय. नुकतीच या नाटकाची रिहर्सल पार पडली. नेहा पेंडसे या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करतेय.

'गुरू' अमेरिकेला, 'शिष्या'ला व्हिसाच नाही मिळाला

Last Updated: Tuesday, April 03, 2012, 03:51

‘वा गुरू’ या गाजलेल्या नाटकाची टूर अमेरिकेला निघाली आहे. ९ एप्रिल ते १२ मे या कालावधीत या नाटकाचा दौरा होणार आहे. मात्र या नाटकात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अद्वैत दादरकरला व्हिसाच मिळालेला नाही.

'मराठी' नाटकाला आले 'सैफ-करीना' !

Last Updated: Thursday, February 09, 2012, 09:52

रविंद्रनाथ टागोर यांच्या १५०व्या जयंती निमित्त ‘चित्रांगदा’ या नृत्य नाटिकेचा पहिला प्रयोग सादर करण्यात आला आणि या नृत्य नाटिकेला बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी हजेरी लावली.

'अँक्शन' रिप्लेची 'अँक्शन'

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 10:52

पुरुष प्रधान संस्कृतीमुळे नवरा बायकोच्या नात्यात येणारे तणाव आणि त्यातून सर्व काही आलबेल करताना दोघांचीही होणारी कसरत हा विषय आहे संगीत अँक्शन रिप्ले या नाटकाचा. अमोल बावडेकर, विजय गोखले आणि गौरी पाटील यांच्या या नाटकाता प्रमुख भूमिका आहेत.

रुईयाचा 'नाका म्हणे'

Last Updated: Saturday, November 26, 2011, 08:35

रुईया कॉलेजची अभिनयसंपन्न पंरपरा ज्या नाक्याने जवळून पाहिली तोच नाका आता बोलका होणार आहे. कारण याच कॉलेजच्या अमृतमहोत्सवा निमित्त 'नाका म्हणे' ही कलाकृती सादर होणार आहे. कॉलेजच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने या कॉलेजमधले सगळे रंगकर्मी एकत्र येऊन सादर करत आहेत.

'सुखांशी भांडतो आम्ही' आता हिंदी आणि गुजराथीत!

Last Updated: Thursday, November 24, 2011, 12:49

चिन्मय मांडलेकर आणि गिरीश ओक यांच्या दमदार अभिनयाने नटलेलं 'सुखांशी भांडतो आम्ही' हे नाटक आता लवकरच हिंदी आणि गुजराथी रंगभूमीवर दाखल होणार आहे. अभिनेता मनोज जोशी या नाटकाचं दिग्दर्शन करणार आहेत.