अजित पवार राजीनामा

अजितदादा मुख्यमंत्री व्हावेतः सुप्रिया सुळे

अजितदादा मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आवडेल अशी इच्छा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलयं. पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या युवती मेळाव्यात सुप्रिया ताईंनी जाहीर वक्तव्य केलयं.

Oct 2, 2012, 05:52 PM IST

मीडिया मसाला मिळाला नाहीः शरद पवार

हा पवार विरुद्ध पवार वाद नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मीडियाला कोणताही मसाला मिळाला नसल्याची मिश्किल टिप्पणी पवार यांनी यावेळी केली.

Sep 28, 2012, 05:58 PM IST

शरद पवार दैवत, त्यांचा निर्णय मान्यः अजित दादा

शरद पवार हे माझे दैवत असून ते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे, असे आज अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र राजीनाम्याबद्दल त्यांनी कोणतंही वक्तव्य न केल्याने अजूनही सस्पेन्स कायम आहे.

Sep 28, 2012, 05:14 PM IST

शरद पवार मुंबईत, जोर-बैठका सुरू

राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईत दाखल झाले, असून दिवसभर जोर-बैठकाचा सिलसिला सुरू होता.

Sep 28, 2012, 04:41 PM IST

शरद पवारांशी मतभेद नाही - अजितदादा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी कोणताही वाद किंवा मतभेद नाही, हा वाद संपूर्ण माध्यमांनी तयार केला, असल्याचे अजित पवार यांनी आज येथे सांगितले.

Sep 26, 2012, 06:33 PM IST

काँग्रेसचं `वेट अँड वॉच`

राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना राजीनामाप्रकरणी मौन बाळगण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारही अडचणीत आलं आहे. मात्र यावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास काँग्रेस श्रेष्ठींनी नेत्यांना मनाई केली आहे. त्यामुळे काँग्रेस सध्या ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेत आहे.

Sep 26, 2012, 03:00 PM IST

`अजितदादा राजीनामा मागे घ्या!`

अजित दादा तुम्ही उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागे घ्या अशी राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांनी मागणी केली आहे. अजितदादांच्या शक्तिप्रदर्शनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळाच्या बैठकीत ठराव मांडण्यात आला आहे. पवारांनी आमदारांच्या भावना जाणून घ्यावात अशी विनंती अजित पवार समर्थक आमदारांनी केली.

Sep 26, 2012, 02:43 PM IST