आदित्यनाथांचा आक्षेपार्ह फोटो 'फेसबुक'वर... विद्यार्थ्याला अटक

आदित्यनाथांचा आक्षेपार्ह फोटो 'फेसबुक'वर... विद्यार्थ्याला अटक

उत्तरप्रदेशच्या गाजीपूरमध्ये पोलिसांनी एका तरुणाला अटक केलीय. सोशल मीडिया 'फेसबुक'वर उत्तरप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 

व्हॉट्सअॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट, ग्रुप सदस्याला अटक

व्हॉट्सअॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट, ग्रुप सदस्याला अटक

व्हॉट्सअॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानं एका ग्रुपच्या सदस्याला पोलीस कोठडीत जावं लागल्याचा प्रकार उल्हासनगरात घडलाय. 

जम्मू कश्मीरमधल्या ३ फुटीरतावादी नेत्यांना अटक

जम्मू कश्मीरमधल्या ३ फुटीरतावादी नेत्यांना अटक

जम्मू कश्मीरमध्ये पोलिसांनी फुटीरतावादी नेते सैयद अली गिलानी, मीरवाइज उमर फारुक आणि मोहम्मद यासीन मलिक यांना अटक केली आहे. पोलिसांनी या तिनही फुटीरतावादी नेत्यांना विरोध प्रदर्शन आणि परवानगी न घेता पत्रकार परिषद घेतल्याने अटक करण्यात आली आहे.

पुण्यातही गर्भलिंग निदानाचा प्रकार उघडकीस, डॉक्टर अटकेत

पुण्यातही गर्भलिंग निदानाचा प्रकार उघडकीस, डॉक्टर अटकेत

म्हैसाळ गर्भलिंग प्रकरणानंतर आता पुण्यातल्या दौंडमध्येही असाच प्रकार सुरू असल्याचं उघड झालंय... याप्रकरणी संबंधित डॉक्टरला अटक करण्यात आलीय. 

उत्तर प्रदेशात माजी मंत्री गायत्री प्रजापती बलात्कार प्रकरणी अटक

उत्तर प्रदेशात माजी मंत्री गायत्री प्रजापती बलात्कार प्रकरणी अटक

समाजवादी पार्टीचे सर्वेसवा मुलायम सिंग यांचे निकटवर्तीय आणि अखिलेश यादव मंत्रीमंडळातील सदस्य गायत्री प्रजापती यांना पोलिसांनी बलात्कार प्रकरणी अटक केली. फरार असणाऱ्या प्रजापतीला लखनऊमधून पोलिसांनी ताब्यात घेतले.

पुण्यात बोगस IPS अधिकाऱ्याला अटक

पुण्यात बोगस IPS अधिकाऱ्याला अटक

नाशिकनंतर पुण्यातही एका तोतया आयपीएस अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत बॉडीगार्ड म्हणून वावरणाऱ्या सहा जणांनाही गजाआड करण्यात आलंय. या तोतयांनी एका व्यावसायिकाचे गुटखा विक्रीच्या संशयावरुन अपहरण करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. 

म्हैसाळ गर्भपात प्रकरण : कर्नाटकमधून एकाला अटक

म्हैसाळ गर्भपात प्रकरण : कर्नाटकमधून एकाला अटक

सांगलीतल्या म्हैसाळ गर्भपात प्रकरणी आणखी एक अटक करण्यात आलीय. 

'झी 24 तास'च्या प्रतिनिधीला मारहाण प्रकरणी 9 जण अटकेत

'झी 24 तास'च्या प्रतिनिधीला मारहाण प्रकरणी 9 जण अटकेत

नवी मुंबईतल्या दिघामध्ये 'झी २४ तास' पत्रकार व कॅमेरामन मारहाणी प्रकरणात आत्तापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

लष्कर पेपर फुटीप्रकरणी तीन जण ताब्यात

लष्कर पेपर फुटीप्रकरणी तीन जण ताब्यात

लष्कराच्या पेपर फुटीप्रकरणी नागपुरातून आणखी तिघांना ताब्यात घेण्यात आलंय. 

आलिया, महेश भट्ट यांना धमकी देणारा गजाआड

आलिया, महेश भट्ट यांना धमकी देणारा गजाआड

अभिनेत्री आलिया भटला जीवे ठार मारण्याची धमकी देणा-याला ताब्यात घेण्यात आलंय. 

व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह डीपी लावल्याने अॅडमिन अटकेत

व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह डीपी लावल्याने अॅडमिन अटकेत

 ग्रुपचा प्रोफाईल फोटो बदलून आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी अॅडमिनवर ही कारवाई करण्यात आली, त्याच्यावर रिसोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला.

ISI च्या 11 हेरांना मध्यप्रदेशातून अटक

ISI च्या 11 हेरांना मध्यप्रदेशातून अटक

मध्यप्रदेशमधून आयएसआयच्या तब्बल 11 हेरांना अटक करण्यात आली आहे. एटीएसनं ही कारवाई केलीय.

विनयभंगाच्या आरोपावरुन मनसे नगरसेवक सुधीर जाधवांना अटक

विनयभंगाच्या आरोपावरुन मनसे नगरसेवक सुधीर जाधवांना अटक

मनसे नगरसेवक सुधीर जाधव यांना अटक करण्यात आली आहे. सुधीर जाधव यांच्यावर विनयभंगाचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात ही तक्रार करण्यात आली होती.

नक्षलग्रस्त भागात जाण्यासाठी नकार देणाऱ्या पोलिसांना अटक

नक्षलग्रस्त भागात जाण्यासाठी नकार देणाऱ्या पोलिसांना अटक

नागपूरच्या एमआयडीसी पोलिसांनी दोन पोलिसांनाच अटक केलीय.

कोब्रासोबतचा व्हिडिओ श्रुतीला पडला महागात

कोब्रासोबतचा व्हिडिओ श्रुतीला पडला महागात

अभिनेत्री श्रुती उल्फत हिला पोलिसांनी अटक केलीय. नुकताच, श्रुतीचा कोब्रा नागासोबत एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय. 

कोब्रासोबतचा व्हिडीओ पोस्ट केल्याने टीव्ही अभिनेत्रीला अटक

कोब्रासोबतचा व्हिडीओ पोस्ट केल्याने टीव्ही अभिनेत्रीला अटक

कोब्रासोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने टीव्ही अभिनेत्री श्रुती उल्फत हिला अटक करण्यात आलीये. वन विभागाने ही कारवाई केलीये. तिच्यासह आणखी एक अभिनेत्री आणि दोन प्रॉडक्शन मॅनेजर्सनाही अटक करण्यात आलीये.

शिवसेनेच्या नगरसेविकेला लाच घेताना अटक

शिवसेनेच्या नगरसेविकेला लाच घेताना अटक

महापालिकेतील शिवसेनेच्या एका नगरसेविकेला १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली.

कानपूर रेल्वे अपघातामागच्या दहशतवाद्याला काठमांडूत अटक

कानपूर रेल्वे अपघातामागच्या दहशतवाद्याला काठमांडूत अटक

कानपूरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या रेल्वे अपघाताचा मुख्य सूत्रधार शमशुल होदा यालरा नेपाळची राजधानी काठमांडू इथून अटक करण्यात आलीय.

मुलींना चटके दिल्याने मुख्याध्यापिकेला अटक

मुलींना चटके दिल्याने मुख्याध्यापिकेला अटक

पैसे चोरल्याचा संशयावरून आदिवासी वस्तीगृहात शिकणाऱ्या ९ वर्षाच्या मुलीला मुख्याध्यापिकेने पाठीवर चटके दिले. पनवेलमध्ये हा गंभीर प्रकार समोर आलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन मुख्याध्यापिकेला अटक झाली आहे.

खासदारांच्या लेटर हेडचा वापर, शासनाची फसवणूक करणाऱ्याला अटक

खासदारांच्या लेटर हेडचा वापर, शासनाची फसवणूक करणाऱ्याला अटक

लोकप्रतिनिधींच्या बनावट पत्राचा वापर करुन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार रत्नागिरीमध्ये उघडकीस आलाय. भाजपाचे राज्यसभेचे खासदार अजय संचेती यांच्या बनावट पत्राचा वापर करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी संतोष नारायणकर याला अटक केली आहे.

'किंगफिशर'ला कर्ज देणारे कायद्याच्या कचाट्यात

'किंगफिशर'ला कर्ज देणारे कायद्याच्या कचाट्यात

किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या 900 कोटींच्या कर्जाप्रकरणी आयडीबीआय बँकेच्या माजी चेअरमनसह नऊ जणांना अटक करण्यात आलीय.