आंबा

आंब्याला मोहोर आल्याने बागायतदार आनंदित

आंब्याला मोहोर आल्याने बागायतदार आनंदित

कोकणात परतीचा पाऊस गेला की नोव्हेंबरची थंडी सुरू होती आणि साधारणपणे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते...मात्र यावर्षी ऑक्टोबरच्या दुस-याच आठवड्यात आंबे मोहोरले आहेत. खास करून कातळावरील आंब्याची कलमे चांगली मोहोरली आहेत.. त्यामुळे आता आलेला मोहोर वाचवण्याचं आवाहन सध्या आंबा बागायतदारांसमोर आहे....

Nov 2, 2017, 08:56 PM IST
ट्रकला अपघात, जखमींना सोडून बघ्यांचा आंब्यावर ताव

ट्रकला अपघात, जखमींना सोडून बघ्यांचा आंब्यावर ताव

माणूस किती असंवेदनशील होत चाललाय त्याचंच एक उदाहरण शिर्डीत समोर आलंय.

May 11, 2017, 06:13 PM IST
अबब! ३० सेंटीमीटर लांबीचा आंबा

अबब! ३० सेंटीमीटर लांबीचा आंबा

सध्या सर्वत्र आंब्याचा सीझन सुरु आहे. पण सध्या चर्चेत आहे तो उरण मधील तोतापुरी आंबा तो त्याच्या लांबीमुळे...

Apr 15, 2017, 08:52 PM IST
मुंबईत फेब्रुवारीत दाखल झाला आंबा

मुंबईत फेब्रुवारीत दाखल झाला आंबा

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मार्चपासून आंब्याचा सीझन सुरु होतो. मात्र, यावर्षी फेब्रुवारीमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या आहेत. पेटीला चार ते पाच हजार रुपये भाव मिळाला आहे.

Feb 8, 2017, 08:05 PM IST
कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक!

कोकण-गुजरातच्या आंब्यांची परदेशवारी... व्हाया नाशिक!

कोकण आणि गुजरातेतील आंबा खरेदी करून परदेशात पाठवण्याचं काम नाशिकच्या शेतकऱ्यांची कंपनी करतेय. गेल्या वर्षी या कंपनीने पाच हजार टन आंबा प्रक्रिया करून गल्फमध्ये पाठवला होता. यावर्षी युरोपासह दहा हजार टन निर्यात अपेक्षित आहे. 

May 24, 2016, 09:01 PM IST
अस्सल 'हापूस'चे भाव उतरले!

अस्सल 'हापूस'चे भाव उतरले!

नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये रोज लाखो पेट्या हापूस आंबा दाखल होतोय. रत्नागिरी देवगड सिंधुदुर्गासह कर्नाटक गुजरातचा आंबाही दाखल होतोय. यामुळे हापूस आंब्याच्या किंमती उतरल्या आहेत. 

May 14, 2016, 09:36 AM IST
स्वादासाठीच नाही तर सौंदर्यासाठीदेखील उपयोगी आंबा....

स्वादासाठीच नाही तर सौंदर्यासाठीदेखील उपयोगी आंबा....

आंबा म्हटल तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं... प्रत्येकाला आंब्याचा काही ना काही पदार्थ नक्कीच आवडत असतो... कोणाला मॅगो शेक, आमरस तर कोणाला नुसताच आंबा चोखून खायला आवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का? आंब्यांचा उपयोग सौंदर्य खुलवण्यासाठीही होतो.

Apr 22, 2016, 11:45 AM IST
कोकणच्या आंब्यात कानडी आंब्याची घुसखोरी

कोकणच्या आंब्यात कानडी आंब्याची घुसखोरी

फळ मार्केटमध्ये कोकणातील हापूस आंब्याबरोबर कानडी आंब्यानंही जोरदार शिरकाव केला आहे. कोकणच्या हापूसच्या निम्म्या किमतीत कानडी हापूस विकला जातो. त्यामुळं आंब्याचे खवय्ये स्वस्तातल्या कानडी हापूसकडे आकर्षित होताना दिसतायंत. तर दुसरीकडं कोकणातल्या हापूसच्या पेटीत कानडी हापूस घुसडून चढ्या दरानं विकण्याचा गोरख धंदाही विक्रेत्यांनी सुरू केल्याचं बोललं जातंय. या सर्व प्रकाराला किरकोळ व्यापारीच जबाबदार असल्याचा आरोप घाऊक व्यापा-यांनी केलाय. 

Apr 21, 2016, 08:44 PM IST
व्हिडिओ : असा आंबा तुम्ही कधीच खाल्ला नसेल

व्हिडिओ : असा आंबा तुम्ही कधीच खाल्ला नसेल

तंत्रज्ञान आता एवढं पुढे गेलं आहे की तुम्हाला कोणत्याही गोष्टी सहज उपलब्ध होतात. जर तुम्हाला आब्यांचा रस खाण्याची इच्छा झाली तर तो ही बाजारात सहज उपलब्ध होतो. आज आंबे खायचे असतील तर ते बाजारात सहज उपलब्ध होतात. पण या व्हिडिओमध्ये आंबे विक्रेता आंबा एवढा सहज सोलून देतो की तुम्हाला ते खाणं अजून सोपं होईल, असा अंबा तुम्ही कधीच खाल्ला नसेल.

Jan 9, 2016, 06:50 PM IST
दुर्देवी: आंब्याने घेतला महिलेचा जीव

दुर्देवी: आंब्याने घेतला महिलेचा जीव

फळांचा राजा आंब्याचा मोह लहाण असो किंवा मोठी व्यक्ती कोणालाच आवरत नाही. आंब्याचा हाच मोह एका महिलेच्या जीवावर बेतला आहे. आंबा काढण्यासाठी झाडावर चढलेल्या महिलेचा खाली पडून दुर्दैवी अंत झाला आहे. 

Apr 25, 2015, 06:06 PM IST
राजा निघाला राणीच्या देशात?

राजा निघाला राणीच्या देशात?

फळांचा राजा हापूसची... हापूसच्या आयातीवर युरोपीय युनियननं घातलेली बंदी आता उठण्याची शक्यता निर्माण झालीय...

Dec 4, 2014, 08:09 PM IST
निलोफर वादळाचा कोकणाला फटका, मासेमारीही ठप्प

निलोफर वादळाचा कोकणाला फटका, मासेमारीही ठप्प

निलोफर वादळामुळं कोकणवासियांच्या दिवाळीवर विरजण पडलंय. हवामानातील बदलामुळं भात, नाचणी पीक उध्वस्त झालंय. तर मासेमारी व्यवसायही ठप्प आहे.  

Oct 27, 2014, 10:54 PM IST
रसरशीत आंबा आरोग्यासाठी खूप उपयुक्त

रसरशीत आंबा आरोग्यासाठी खूप उपयुक्त

फळांचा राजा कोण तर... आंबा... सध्या बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे आंबे मिळत असतात. माळदा, दशहरी, सफेदा अशा अनेक प्रकारचे आंबे असतात. 

Jun 29, 2014, 01:32 PM IST

आंबा घेतांना सावधानता बाळगा, कॅन्सरही होऊ शकतो!

आंबा... फळांचा राजा... दरवर्षी प्रत्येकालाच हापूस आंबा खायला मिळेल असं नाही. पण यंदा हापूसवर युरोपात बंदी घातल्यामुळं भारतीय मार्केटमध्ये आंबा भरपूर आहे. मात्र आंबा घेतांना खातांना जरा सावधानता बाळगा, कारण त्यामुळं कॅन्सर होण्याचीही भीती आहे.

May 7, 2014, 11:30 AM IST

फळमाशीने दिला हापूस निर्यातीला दगाफटका

युरोपमध्ये हापूस आंब्यापाठोपाठ भाज्यांवरही बंदी टाकण्यात आलीय. भारतातल्या ४ भाज्या आणि हापूस आंब्यावर ही बंदी घालण्यात आलीय. 1 मे 2014 पासून युरोपियन युनियनकडून ही तात्पुरती बंदी घालण्यात आलीय. फळमाशी आढळल्यामुळे युरोपमध्ये भारतीय आंब्याला बंदी घालण्यात आलीये.

Apr 29, 2014, 10:25 AM IST